चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग१.
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग१.
दीपक देशपांडे
१८व्या लोकसभा निवडणुकीत १३ चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या सहचारिणी प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपाचे उमेदवार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चुरशीची पण एकतर्फी लढत झाली.
खरेतर ही लढत भाजपच्या बाजूने एकतर्फीच व्हायला हवी होती पण बाजी पलटली आणि ती इंडी आघाडीच्या बाजूने एकतर्फीच झाली असे म्हणायला काही हरकत नसावी.,
या क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहिर ही निवडणूक लढण्यास तयार होते मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी कधी कसा दावा केला होता माहिती नाही पण त्यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तबच केले नाही तर पहिल्या यादीत त्यांचे नावाची घोषणा करुन टाकली आणि जिल्ह्यात विकासाचा झंझावात आणणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात कुणी टिकाव धरुच शकणार नाही ही वस्तुस्थिती दिसत होती त्यामुळे त्यादिशेने नाव जाहीर होताच प्रचारात आघाडी घेतली गेली तरीही कांग्रेस उमेदवार जाहीर झालेला नव्हता , प्रयत्नांची पराकाष्ठा करत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आपल्यासाठी नव्हे तर आपल्या कन्येसाठी मुंबई दिल्ली वाऱ्या करीत शक्य ते सर्व प्रयत्न करीत होते, याशिवाय प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळू नये यासाठी जीव ओतून प्रयत्न करीत होते ही बाब मतदारसंघात प्रामुख्याने चर्चेत होती,तर माजी खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर ही उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे सगळे प्रयत्न करीत होत्या.
शेवटी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि काॅंग्रेसच्या गोटातील गटबाजीचा उद्रेक होऊन शकतो असे वाटायला लागले असतांनाच सुधीर मुनगंटीवार वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आणि शक्ती प्रदर्शन करण्यात गुंतले असतांनाच प्रतिभा धानोरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि एकतर्फी बाजी मारलीच होती . सुधीर मुनगंटीवार यांनी वाजतगाजत मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला इकडे काॅंग्रेसच्या गोटातून दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभा धानोरकर यांचा अर्ज दाखल करताना भाजपपेक्षा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झाले पाहिजे याची पूर्ण तयारी केली गेली, आणि दुसऱ्या दिवशी इंडी आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी सहभागी होत केलेले शक्ती प्रदर्शन भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना व उमेदवाराला धडकी भरवून गेले . निदान तसे भासविण्यात आले आणि वंचितनेही राजेश बेले च्या रुपाने आपला तगडा उमेदवार जाहीर केला व तोही आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आणि खरा संघर्ष तिथुनच सुरू झाला........
उर्वरित पुढील भागात....
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment