चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग२.
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....भाग २.
दीपक देशपांडे
निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले गेले , आणि खऱ्या अर्थाने मतदारांचा कौल आपल्याला मिळावा यासाठी, उमेदवार,आघाडीचे कार्यकर्ते, राष्ट्रीय पातळीवरील नेते, राज्यातील महत्वाचे नेते यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली.
या रणधुमाळीत कुणी "आयेगा तो मोदीही" असे म्हणत बिनधास्तपणे फक्त "झलक दिखला जा"करीत आपल्याच तोऱ्यात वावरताना दिसले ,तर कुणी ,काहीही झाले तरी,"भाजपा सत्तेत येता कामा नये"या ध्येयाने प्रेरित होऊन "रात्रीचा दिवस करून" स्वयंस्फूर्तीने प्रचाराची धुरा सांभाळत होते.
कुठे कुणाचा कुणाशी ताळमेळ बसत नव्हता तर कुठे ताळमेळ नसला तरीही विरोधात राजकारण पेटवायचे आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपापसातील द्वेष दूर सारून आपण एकसंघ असल्याचे चित्र उभे करीत आपली भूमिका वठवीत आपला पाया तयार करायचा ही संकल्पना राबविण्यात मग्न होते.
कुणी वरुन मदतीचा हात दिला नाही म्हणून सायंकाळी बार रेस्टारंटमध्ये "गम भुलानेकी कोशिश* करताना दिसलेत तर कुणी "घरात प्रवेश नसला तरी बसस्थानकाचे परिसरात" गाडी पार्क करून उद्याच्या प्रचाराची रणनीती आखताना आढळलेत.
कुणी जातीसाठी माती खायला तयार झालेत तर कुणी जातीयवादाचे शस्त्र उगारुन आपल्याच लोकांना परके करुन गेले. कुणी विकासावर मत मागायचा प्रयत्न केला तर कुणी विकासातील त्रुटी पुढे करीत झालेला भ्रष्टाचार व जनतेची फसवणूक नजरेत आणून देण्याचा प्रयत्न केला.
मतदार म्हणून जनतेच्या भावभावनांचा मात्र कुणीही विचार केला नाही पण आश्वासनांचे गाजर आणि आश्वासीत कार्यातील अडथळे यांची भरपूर चर्चा झाली आणि मतदारराजाला त्यांचे प्रती केली गेलेली कामे विसरुन आश्वासनांचे गाजरच अधिक गोड वाटले आणि म्हणूनच निकाल लागला तेंव्हा विकासाची परिभाषा बदलून , निष्ठा आणि कर्तव्ये बाजूला सारून ,जातियवादाला खतपाणी घालत आजच्या आधुनिक युगात सुद्धा "जात" किती महत्वपूर्ण आहे ह्याचेच खूले प्रदर्शन केले ,हे मान्यच करावे लागेल.
हे करताना उमेदवारांनी दाखवलेली आपल्या कार्याची झलक व जनतेत निर्माण झालेला संभ्रम कसा आपल्या फायद्याचा ठरेल यासाठी तयार केलेल्या कुटनितीचा परिणाम जनतेला आपलासा वाटावा ह्यासाठी वापरलेली आपल्याच माणसांची वक्तव्ये संभाव्य विकासाची कामे बाजूला सारून विरोधात मत तयार करण्यात यशस्वी ठरलेत.हीच काय तुमची पक्षनिष्ठा आणि समर्पणाची भावना,ह्याचा कुणीही विचार केला नाही. तर दुसरीकडे आपापसातील विरोध बाजूला ठेवून सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकला चलोरे चा नारा देत समाजमन ढवळून काढण्यात यशस्वी ठरणारे विरोधक प्रशंसेसाठी पात्र ठरलेत.
एकीकडे भाजपव युतीतील न दिसणारा संघर्ष आणि दुसरीकडे आघाडीतील बिघाडी नजरेआड न करता केवळ मोदी हटाव साठी एकत्र येऊन घेतलेली मेहनत आणि कधीही पूर्ण करु न शकणाऱ्या आश्वासनांची खैरात यामुळे जनमत दुषीत करण्यात यशस्वी ठरलेल्या विरोधकांना जेंव्हा सत्तेतील मतलबी शुक्राचार्यांनी आयताच देऊ केलेला मदतीचा हात...सगळ्यांनीच उघडपणे बघितला पण..... त्याविरोधात कुणी एक शब्दही काढला नाही.
.... तरीही म्हणायचेच नाही ...... चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ज्यांचेवर विश्वास त्यांनीच दगाफटका केलाय.....!
उर्वरित पुढिल भागात...
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment