विशेष:-धरती आबा पंतप्रधान जनमन योजना शिबिराची सांगता!

 *विशेष*

पंतप्रधान जनमन ग्राम उत्कर्ष योजना शिबिर केवळ एक औपचारिकता!

मौजा भवराळा येथे उद्घाटन सोहळा संपन्न होताच सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी पळता पाय काढल्याने ग्रामस्थ संतापले.

 

मूल, डीडिन्यूज ब्युरो 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक १५ जून ते ३० जून दरम्यान राबविण्यात येत असलेल्या धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना व पंतप्रधान जनमन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यांत विविध तालुक्यातील निवडक गावात ह्या योजने अंतर्गत आदिवासी बहुल गावात आदिवासी बांधवांना विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या योजनेचा लाभ देण्यासाठी मूल तालुक्यातील मुरमाडी, चिखली,आकापूर,जानाळा व तालुक्याच्या  शेवटच्या टोकावर असलेल्या भवराळा या गावांची या योजनेचा लाभ देण्यासाठी निवड करण्यात आली होती, त्यानुसार दिनांक १७/०६रोजी मुरमाडी येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर दिनांक १९/०६रोजी चिखली येथे,२३/०६रोजी आकापूर येथे २५/०६रोजी जानाळा येथे कार्यक्रम आयोजित करुन ते पार पाडण्यात आले यानंतर दिनांक २७/०६/२०२५रोजी भवराळा येथे या योजनेचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या आयोजनातील त्रुटींबाबत आणि हे आयोजन ही केवळ औपचारिकता असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने जागृत ग्राहक  राजा संघटनेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी दिनांक २३/०६रोजी मौजा आकापूर येथे उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभव घेतला तेव्हा जे विदारक चित्र पुढे दिसले त्याबाबत व्यासपीठावर उपस्थित राहून अतिथी म्हणून बोलताना ती खंतही व्यक्त केली होती. त्यानंतर जानाळा येथे कार्यक्रम पार पडला परंतू परत तसाच प्रकार घडल्याचे वृत्त हाती आले होते परिणामी दिनांक २७/०६रोजी भवराळा येथे सांगता समारंभात उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे ठरविले आणि ते भवराळा येथे उपस्थित झाले.

या कार्यक्रमात भवराळा च्या सरपंच वैशाली चौधरी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न  झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दीपक देशपांडे यांना मानही मिळाला, त्यांचे सोबत,मूल चे नायब तहसीलदार दिनेश पवार, मंडळ अधिकारी के.उईके, प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडाचे वैद्यकीय अधिकारी  डॉ रोहित कुमार, जागृत ग्राहक राजा चे डॉ आनंदराव कुळे, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, वनिता  गंदेवार ,भवराळा च्या उपसरपंच वैशाली गोंधळी, रमेश शेंडे, रमेश गायकवाड, माजी उपसरपंच देवराव घोडमारे, राजेश निर्माते दिग्दर्शक निरिक्षण अधिकारी पुरवठा विभाग तहसील कार्यालय मूल आणि इतर मान्यवर मंचावर विराजमान होते.

 संचालन कर्त्या  मुख्याध्यापक  यांना कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत , मंचावर विराजमान कोण आहेत याची माहिती नव्हती की या कार्यक्रमात नेमकं कोण बोलणार याबाबत त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला व सुत्रसंचलन सुरू केले व स्वागत  समारंभ संपन्न होताच सरळ कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी नायब तहसीलदार दिनेश पवार यांनाच पाचारण केले तेव्हा त्यांनी  आक्षेप घेतला असता आम्हाला आयोजक कोण आहेत , याची माहिती नव्हती असे उत्तर दिले, कार्यक्रमाची प्रस्तावना ठेवताना दिनेश पवार यांनी शासनाच्या वतीने आयोजित या उपक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी स्पष्ट करुन आदिवासी  समाजातील जनतेच्या सहकार्यासाठी शासन आपल्या दारी आले असून या योजनेअंतर्गत नागरिकांना एकत्र त्यांच्या गावात नानाविध दाखले, आरोग्य तपासणी व शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे व त्यामुळे आदिवासी बांधवांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सुत्रसंचलकांनी यानंतर सरळ कार्यक्रमाचे  अध्यक्षीय भाषण करण्यासाठी  गावच्या  सरपंच वैशाली चौधरी यांचे नाव घेतले मात्र उपस्थित  मान्यवरांनी मंचावर विराजमान दीपक देशपांडे बोलतील असे स्पष्ट करीत त्यांना  बोलण्याची संधी  देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला व नंतर तशी संधी दिली.

त्यांचा यथोचित सन्मान केला व व्यासपीठावर स्थान दिले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आभार मानले पाहिजेतच आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे ऋण मानून त्यांची वाहवा करायला पाहिजे , बरोबर ना? परंतू दीपक देशपांडे यांनी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने,"ग्राहक राजा जागा हो,शोषणमुक्त समाज रचनेचा धागा हो" असा नारा देत ग्राहक प्रबोधनाचे कार्य करीत असल्याने या आयोजनातील त्रुटींबाबत न बोलताच निघून आलो असतो तर... आम्ही आमच्याच इमानासोबत न्याय केला नसता आणि ते आम्हाला कधीच मान्य झाले नसते, परिणामी वस्तुस्थितीची जाणीव करून देत ग्राहक हक्कासाठी उभारलेल्या या यज्ञकुंडात चुकीच्या घटना नोंदवून जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याची संधी न गमावता त्याबाबत व्यासपीठावरून आपले स्पष्ट मत नोंदवले, व अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा उद्देश काय?हे समजून घेणे व शासनाच्या अशा लोककल्याणकारी योजना  घेऊन शासन आपल्या दारी आले असेल तर आपलीही जबाबदारी काय आहे? ह्याबाबत जागरूक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले त्याचवेळी शासकीय अधिकारी शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी त्याचा योग्य व पुरेपूर प्रयत्न करीत नाहीत  परिणामी जनतेला अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपला काही लाभ होऊ शकतो याची कल्पनाही नसते व अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा उद्देश सफल होत नाही ,असे परखड मत व्यक्त केले. याच मंचावरून जनतेला आजच्या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला नव्हती काय? असा प्रश्न विचारला असता काल संध्याकाळी मुनादी केल्याचे सांगितले गेले परंतु विविध दाखले मिळतील याबाबत काही माहिती नव्हती त्यामुळे जनता केवळ भाषण ऐकण्यासाठी काय जायचे म्हणून शेतीच्या कामासाठी निघून गेली होती,असे उत्तर मिळाले. यामुळे किमान पंधरा दिवस आधी पासून काढलेल्या तहसीलदार यांचे पत्राची या उत्तराने ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी किती गंभीरपणे दखल घेतली हे वेगळे सांगायची गरजच उरली नाही.

 सरपंच वैशाली चौधरी यांचे अध्यक्षीय भाषण झाले, आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी देवराव घोडमारे यांना पाचारण करण्यात आले, तेव्हा त्यांनी आजच्या कार्यक्रमाची माहिती जनतेला नव्हती त्यामुळे  जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही हे वास्तव पुढे ठेवले व  हा कार्यक्रम किती वाजेपर्यंत सुरू राहील अशी विचारणा नायब तहसीलदार दिनेश पवार यांनाच केली असता, नायब तहसीलदार दिनेश पवार यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील अशी ग्वाही दिली तेव्हा त्यांनी घरी असणाऱ्या वा उपस्थितांनी पाच वाजेपर्यंत  या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले तेव्हा उपस्थित जनसमुदायापैकी बऱ्याच महिला घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन,तर काही जण शेतात गेलेल्या आपल्या सग्यासोयऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देत तेथून त्यांना बोलावून  अवघ्या काही मिनिटांत कार्यक्रम स्थळी दाखल झाले मात्र आधीच  अर्ध्याहून  अधिक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित झालेच नव्हते व  औपचारिकता पूर्ण करण्यासाठी या वेळेपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी नायब तहसीलदार दिनेश पवार कार्यक्रम स्थळावरुन जाताच क्षणी आपला गाशा गुंडाळून पोबारा केला होता, आणि गावकरी त्यांच्या नावाने ओरड करीत होते , यावेळी जेमतेम एक वाजून चाळीस मिनिटे झाली होती यावेळी इथे फक्त आदिवासी विभागाचे निरीक्षक अमोल शिंदे तेवढे उपस्थित होते इतर कुणालाही उपस्थित राहण्याची आवश्यकता वाटलीच नाही.

ही बाब आम्हाला माहिती आहे आणि  आम्ही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत कारण...... कार्यक्रम संपल्यानंतर गावच्या सरपंच उपसरपंच आणि गावकरी यांचे सोबत आम्ही सरपंच यांचे दालनात गावातील समस्यांबाबत चर्चा करीत होतो. आणि ही चर्चा सुरू  असताना ग्रामसेवक  पवार साहेबांनी बोलावले म्हणत बाहेर  पडले ते आलेच नाहीत,सबब  ही चर्चा आटोपून आम्ही बाहेर आलो तर ग्रामसेवकापासून तलाठी मंडळ अधिकारी, कृषी सहायक, आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचारी व तंत्रज्ञांसह कुणी कुणीही तिथे उपस्थित नव्हते.

शासनाच्या वतीने अल्पाहाराची सोय करण्यात आली होती त्याचा लाभ घेण्यासाठी सुद्धा कोणी उपस्थित राहिले नव्हते, मात्र सरपंच उपसरपंच, सदस्यगण व ग्रामस्थ व महिला ज्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन आल्या होत्या त्या इथे कार्यक्रम स्थळी येऊन एल्गार करीत होत्या.

याबाबत  सत्यपरिस्थिती जिल्हाधिकारी साहेब यांचे पर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्याची मागणी  सरपंच वैशाली चौधरी यांनी दीपक देशपांडे यांच्या समोरच अमोल शिंदे यांच्या कडे केली तेंव्हा ते म्हणाले,या कार्यक्रमाचे आयोजनच मुळात जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार झाले असल्याने यावर ते लक्ष ठेवून आहेत , आणि आमचा अहवाल सरळ त्यांनाच जातो.

ह्या  कार्यक्रमाचे आयोजन ही  अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी रचलेला एक बनाव आहे हे स्पष्ट करण्यासाठी अजूनही काही पुरावे देण्याची आवश्यकता आहे? शासन प्रशासन अशा पद्धतीने कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर कोणती कारवाई करणार असा प्रश्न ग्रामस्थांनी, गावातील सरपंच उपसरपंच सदस्यगण यांनी उपस्थित केला आहे आणि जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत या संघटनेच्या वतीने  दीपक देशपांडे,प्रांत अध्यक्ष यांनी अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा उद्देश केवळ औपचारिकता पूर्ण करणे आहे काय? याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांचे कडे विचारणा करीत तातडीने कानाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली  आहे.

आम्ही कुणाच्या विरोधात नाही परंतु व्यवस्था सुरळीत करणारी चळवळ आम्ही चालवतोय परिणामी या व्यवस्थेत असलेला हा बनाव आम्ही सहन करणार नाही आणि जनजागृती करताना कुणी जनतेची दिशाभूल करणारं नाही यासाठी आमचा लढा सुरूच राहील असेही दीपक देशपांडे यांनी स्पष्ट केले.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.