हरिणीला जीवन दान.
हरिणीला जीवन दान.
दीपक देशपांडे
आज सकाळी ९:१५ चे दरम्यान मूल गडचिरोली रोडवर आकापुर गावाच्या एक कि.मी.समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मादी चौसींगा हरीण जखमी झाले.. माहिती मिळताच वनरक्षक एस.डब्लु.बोनलवार , संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, दिनेश खेवले, मनोज रणदिवे हे घटनास्थळी उपस्थित झाले व माजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौनकर यांनी जखमी मादि चौसींगा हरीण वर प्राथमिक उपचार केले.
त्यानंतर जखमी चौसींग्याला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले व सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे यांचे सूचने नूसार पूढील उपचारासाठी चंद्रपूर प्राणी उपचार केंद्रात पाठविण्यात आले....
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment