मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.
मूल तालुक्यातील गुणवंत
मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.
मूल, दीपक देशपांडे.
मूल येथील अभिनय विभा विठ्ठल बोथले याने एमबीबीएस ची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण करीत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.
त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ.अभिनय ह्याचे १ली ते७वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, त्यानंतर वर्ग ८ते१०वी पर्यंतचे शिक्षण शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय व्याहाड खुर्द येथे झाले.
वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या अभिनयला शिक्षणाची गोडी होती आणि तो अतिशय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत होता , त्यामुळे एकेकाळी दोन वेळेच्या खाण्याचे वांदे असलेल्या आईने एसटी महामंडळात कशीबशी नौकरी मिळवली आणि दिवस पालटत गेले आणि आजही एसटी महामंडळ मूल येथे कार्यरत आईने नौकरी च्या ठिकाणी मूल येथील नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूल येथे त्याचा अकरावीत प्रवेश घेतला ,कठोर परिश्रम घेत अभिनयने अकरावी बारावी ची परीक्षा सोबतच निटची परीक्षा देत दोन्ही परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करीत एमबीबीएस ला प्रवेशाचा मार्ग सुकर केला. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे प्रवेश मिळवला आणि आज त्याने जून २०२६मध्ये एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण करीत तो डॉक्टर झाला आहे आणि आपल्या आईचे स्वप्न साकारले असून इंटर्नशिपनंतर एमएस करण्याची त्याची इच्छा असून त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याच्या यशाचे वृत्त माहिती होताच मूल शहरातील मित्र परिवार , विविध राजकीय, सामाजिक संघटना यांनी डॉ.अभिनयचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ अभिनयला तातडीने भुसावळ येथे इंटर्नशिपसाठी उपस्थित व्हावे लागल्याने त्याची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही मात्र एसटी महामंडळ मूल येथे वाहतूक नियंत्रक म्हणून चिरपरिचित श्रीमती विभा विठ्ठल बोथले यांनी त्यांची चिकाटी आणि कठोर परिश्रमाची माहिती दिली आणि माझ्या स्वप्नपूर्तीसाठी तो सतत अव्वलच ठरत आला असे मत व्यक्त केले आणि भविष्यात तो अडल्याननडल्यांसाठी मदतीला धावून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्याच्या यशाने आईचे मन भरून आले असल्याचे प्रत्येक शब्दातून दिसून येत होते आणि तो आनंद लपवता येत नव्हता, आणि आपण खडतर प्रवासातून त्याला घडविल्याचा आनंदही लपवता येत नव्हता.
अशा या डॉ. अभिनयचे जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी मूल तालुका शाखा पदाधिकारी यांचेसह अभिनंदन करीत त्याला पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment