दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.

२ वर्ष ६ महीण्यापुर्वी हरवलेल्या व्यक्तीचा मूल पोलीसांनी केरळ राज्यातुन घेतला शोध

श्री. विजय राठोड, पोलीस निरीक्षक यांचे कार्यतत्परतेने हरवलेल्या व्यक्तीस नातेवाईकांशी मिळवणे झाले शक्य

दीपक देशपांडे.

मूल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथिल सौ लताबाई बंडू खोब्रागडे वय ५५ वर्ष यांनी दिनांक २२/०९/२०२३ रोजी तक्रारदार सौ लताबाई बंडू खोब्रागडे वय ५५ वर्ष राहणार बोरचांदली तालुका मुल जिल्हा चंद्रपूर यांनी तक्रार दिली की, त्यांचे पती बंडू बुधा खोब्रागडे वय ६० वर्ष रा. बोरचांदली तालुका मूल जिल्हा चंद्रपूर हे दिनांक ८/९/२०२३ रोजी कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेले त्यांचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने पोलीस स्टेशन मूल यथे मिसिंग क्रमांक ५१ / २०२३ प्रमाणे नोंद करण्यात आले. सदर हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना सदर व्यक्ती व्यक्ती हा पोन्नानी म्युनिसिपलिटी इमर्जन्सी केअर अँड रिकव्हरी सेंटर, पोन्नानी, राज्य केरला येथे उपचार घेत असल्याची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी तात्काळ पोलीस अंमलदार वेदनाथ करंबे ब. नं. ५८३ यांना शोधकामी पोन्नानी राज्य केरला येथे रवाना करून हरवलेला व्यक्ती बंडू खोब्रागडे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मूल येथे सुखरूप आणून त्यांना त्यांचे नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले. .

खाकीतील देवदुत:-या शोध मोहिमेत तालुका मूल जिल्हा चंद्रपूर मार्गदर्शन करणारे अधिकारी

१) श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपुर २) श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर ३) सत्यजित आमले, उप विभागीय पोलीस अधिकारी, मूल

आणि पोलीस स्टेशन मूलचे कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार

१) विजय आर. राठोड पोलीस निरीक्षक पो. स्टे. मूल २) पो. अं. वेदनाथ करंबे ब.नं. ५८३

त्याबाबत बंडू खोब्रागडे व त्यांचे नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्यासह मूल पोलीस व चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.