मूलमध्ये १८ ऑक्टोबरला "भाऊंचा गरबा महोत्सवात अभिनेत्री प्रार्थना बेहरे व आम. सुधीर मुनगंटीवार* यांची विशेष उपस्थिती

 मूलमध्ये १८  ऑक्टोबरला "भाऊंचा गरबा महोत्सवात अभिनेत्री प्रार्थना बेहरे व आम. सुधीर मुनगंटीवार*  यांची विशेष उपस्थिती.



मूल :- दीपक देशपांडे .            नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर घालण्यासाठी मूल येथे स्व.चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मुल च्या वतीने ‘भाऊंचा गरबा महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, मूल येथे हा महोत्सव रंगणार असून विविध गरबा स्पर्धा व आकर्षक बक्षिसे हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या गरबा महोत्सवात दिनांक 18 ऑक्टोबरला "पवित्र रिस्ता",  माझी तुझी रेशीमगाठ व *मितवा* पिक्चर फेम *सिनेतारका प्रार्थना बेहेरे व माजी वित्त, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार* यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. 

या महोत्सवात मूल शहर व तालुक्यासह परिसरातील गरबाप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन स्व. चांगुनाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मुल द्वारा आयोजित भाऊंचा गरबा महोत्सव समितीने आवाहन केले आहे.

महोत्सवातील खुल्या गटातील गरबा स्पर्धा,

मूल तालुका व मुल शहर गटासाठी स्वतंत्र गरबा स्पर्धा,

सोलो व कपल गरबा स्पर्धा, रिल्स स्पर्धा चे 

 आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. तसेच दररोज आकर्षक बक्षीस  व भेटवस्तूही देण्यात येत आहेत.या भाऊंचा गरबा महोत्सवाला मूल शहर व तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक स्व. चांगुनाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मूल  यांनी केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.