मिशन आयएएस आधी केले मग सांगितले !
मिशन आयएएसने संपूर्ण महाराष्ट्रात १८१८९ कार्यशाळा घेऊन एक आगळा वेगळा विक्रम केलेला आहे. त्याची ही संक्षिप्त माहिती वाचकांसाठी सादर करीत आहोत.
मिशन आयएएस
आधी केले मग सांगितले
महाराष्ट्राच्या १३ मुख्य सचिवांनी व तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी भेट देऊन गौरविलेल्या अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाची मी सुरुवात १२ मे २००० रोजी केली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे उद्घाटन तत्कालीन यवतमाळचे जिल्हाधिकारी व आता महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव असलेले मा.श्री विकास खारगे आयएएस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती मनपा आयुक्त श्री धनराज खामतकर व प्रमुख वक्ते म्हणून श्री अभिनय कुंभार मुख्य आयकर आयुक्त मुंबई उपस्थित होते. अमरावतीच्या विद्यापीठाजवळील सुप्रसिद्ध अशा दंत महाविद्यालयात ही कार्यशाळा झाली.
२०००या काळात अमरावतीला तसेच महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचे वातावरण नव्हते. अमरावतीला तर स्पर्धा परीक्षा ग्रंथालय वअभ्यासिका पण नव्हती. शिक्षक व प्राध्यापक घरी शिकवण्या घ्यायचे. त्यावेळी मी अमरावतीच्या गाडगे नगर राठीनगर या विद्यार्थी बहूल भागात स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी हॉल भाड्याने घेण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही भाड्याने पण हॉल दिला नाही .कारण मुले येणार. पार्किंग .संडास बाथरूमचा वापर . मुलांचे जाणे येणे हे लोकांना पसंत पडले नाही.
या कामासाठी मी श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील माझा राहता बंगला डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या अभ्यासिकेला व ग्रंथालयाला देण्याचे ठरविले .माझी पत्नी विद्या तिने त्याला होकार दिला. आणि अमरावती शहरातील पहिली अभ्यासिका आमच्या प्रशस्त बंगल्यात सुरू झाली .आता या गोष्टीला २६ वर्षे पूर्ण होत आहेत.
आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रातून फक्त २३ मुले युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करीत होते. पण आता चित्र बदलले आहे .हा आकडा १०० पर्यंत गेला आहे. त्यामध्ये आमचा खारीचा वाटा उचलला आहे.
या पंचवीस वर्षात आम्ही फार मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत. कुठल्या प्रकारची मानधनाची प्रवास खर्चाची अपेक्षा न ठेवता आम्ही सातत्याने स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेत राहिलोत. त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.त्याचा असा परिणाम झाला की आज महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार झाले आहे.
या पंचवीस वर्षात जवळपास आमच्या उपक्रमामध्ये आतापर्यंत ३७९ आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेली ही भारतातील एकमेव संस्था आहे.
अकादमीने लातूरच्या संस्कार प्रकाशनाच्या मदतीने दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांपासून जूनियर आयएएस कॉम्पिटिशन हा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी नाममात्र प्रतिदिन एक रुपया म्हणजे वर्षाला ३६५ रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यामध्ये मुलांना त्या त्या वर्गाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात येतात. प्रत्येक वर्गाचे पुस्तक हे वेगळे आहे. मराठीत आहे. इंग्रजीतही आहे.हे पुस्तक त्यांच्याच अभ्यासक्रमावर आधारलेले असते .फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली असते .याशिवाय त्यांना टेस्ट सिरीजचे पुस्तक पण विनामूल्य देण्यात येते. नियमितपणे त्यांच्या टेस्ट सिरीज आणि वार्षिक परीक्षा होतात. त्यांना गुणपत्रिका प्रमाणपत्र व मोमेंटो देण्यात येतात.पुस्तकांसाठी किंवा टेस्ट सिरीजसाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाही .
डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत कोणताही क्लास काढला नाही. आमचे उद्दिष्ट हे स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार करणे होते. कोचिंग क्लास काढणे नव्हते. शिवाय आयएएसला प्रशिक्षण जे तज्ञ मार्गदर्शक लागतात ते देखील अमरावतीला उपलब्ध नव्हते. कोचिंग क्लास काढला असता तर आम्ही भरपूर पैसे मिळाले असते. पण आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जी जनजागृती केली आहे ती कदाचित शक्य झाली नसती. दुसरी गोष्ट मी व माझी पत्नी विद्या आम्ही दोघेजण चांगल्या नोकरीला प्राध्यापक आणि मुख्याध्यापिका असल्यामुळे व चांगला पगार असल्यामुळे आम्हाला पैशाची आवश्यकता पण नव्हती.
मी माझा फोन आजही २४ तास स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी मोकळा ठेवला आहे. माझा फोन रात्री देखील सुरूच असतो. हेल्पलाइनसाठी माझाच क्रमांक दिलेला आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांने फोन केला तर त्याचे समाधान मी करतो. त्यांच्या प्रश्नांची विनयाने उत्तर देतो. आणि त्याच्या मदतीला धावून जातो.
दरवर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही घेतो. या उपक्रमामध्ये संपूर्ण भारतातून पहिली आलेली कु. शिना अग्रवाल हरियाणा कुमारी सृष्टी देशमुख भोपाळ यांचे भव्य कार्यक्रम आम्ही अमरावतीला आयोजित केले आहे. याशिवाय श्री अमृतेश औरंगाबादकर हे महाराष्ट्रातून पहिले आले आणि भारतातून दहावे आले .त्यांचा देखील भव्य सत्कार आम्ही अमरावतीला महाराष्ट्रातील भव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित केला होता .हा कार्यक्रम रात्री तीन वाजेपर्यंत चालला होता. हा देखील एक विश्वविक्रम आहे .
वेळोवेळी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरणारे तसेच काही सनदी राजपत्रित अधिकाऱ्यांची ओळख करून देणारी पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्याची संख्या ७३ च्या वर आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन घेण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे . स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन घेणारी मिशन ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. आमच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व तत्कालीन वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री जे पी डांगे हे होते तर दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रपतींचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र जाधव आय ए एस हे होते तर तिसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष श्री रंगनाथ नाईकडे आय एफ एस होते. यावर्षी ६ जून २०२६ ला आता चौथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन झाले. ते शंभर कोटी रुपये मूल्य असलेल्या व आठ एकरामध्ये विस्तार असलेल्या अमरावती परतवाडा रोडवरील सिकची रिसॉर्ट मध्ये संपन्न झाले .त्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध माजी सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर हे होते. उद्घाटनासाठी अबुधाबीवरून डॉ.चंद्रशेखर मुरादे हे आले होते.
आमच्या ह्या उपक्रमात माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई ह्या देखील सहभागी झालेल्या आहेत. त्यांना हा उपक्रम आवडला. आता आम्हाला कुठे जायचे असले तर कमलताई गवई आमच्याबरोबर येतात. त्यांचीच गाडी घेतात. पेट्रोल त्याच टाकतात आणि त्यांची गाडी असल्यामुळे व माजी लेडी गव्हर्नर तिला टोल नाका लागत नाही. दररोज पाच स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा आमचा संकल्प असतो. त्यासाठी आम्ही सकाळी सहा ते सातच्या सुमारास घराबाहेर पडतो. एका विशिष्ट भागाची आम्ही निवड करतो .त्या भागातील रोडवर असणाऱ्या शाळा महाविद्यालय संस्था वसतीगृह यामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतो .
आमची टीम स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते तर श्रीमती कमलताई गवई ह्या भारताचे माजी सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांची यशोगाथा सांगतात .
जेवण देखील आम्ही चालत्या गाडीतच करतो .
त्यासाठी आम्ही घरून निघतानाच पुरेसे खाद्यपदार्थ फळ फळावळ घेतलेले असतात. कुठेही जेवण केलं तर एक दीड तास जातो.त्या दीड तासामध्ये एक विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा जास्त होते .त्यामुळे आमच्याबरोबर असलेले सर्वजण चालत्या गाडीमध्ये भोजन करतात .
आज माझे वय ७४आहे. अजूनही हा उपक्रम सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे. या वाटचालीत अनेक आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे तसेच माझ्या सर्व मित्रांनी व परिवारातील लोकांनी समर्थ साथ दिल्यामुळेच तसेच महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांनी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिल्यामुळे मी हा उपक्रम प्रामाणिकपणे व निःस्वार्थपणे चालवू शकलो व पुढेही चालू ठेवणार आहे.
प्रा.डाॅ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

तुमच्या कार्यशाळेतून झालेले अधिकारी किती आहेत?? काही आकडा.. सांगितला नाही.. बाकी सगळ सांगितलं.. पेट्रोल कोण टाकत.. टोल लागत नाही.. किती कोटीचा रिसॉर्ट आहे.. मुख्य गोष्टच विसरला.. गुर्जी
ReplyDelete