येत्या निवडणुकीत १४ आमदारच मतदार नाहीत?

  येत्या निवडणुकीत १४ आमदारच मतदार नाहीत?



नागपूर : दीपक देशपांडे.

विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राजकीयदृष्ट्या रंगत असताना सहा जिल्ह्यांतील १४ आमदार मात्र मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहणार आहेत. प्रचारातील त्यांची भूमिका महत्त्वाची असली, तरी पदवीधर नसल्याने त्यांना मतदान करता येणार नाही.

सहा जिल्ह्यांतील ३२ आमदार; १४ जण मतदार नाहीत.त्त्वाची असली, तरी पदवीधर नसल्याने त्यांना मतदान करता येणार नाही.

नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. या सहा जिल्ह्यांतून विधानसभेवर निवडून आलेले एकूण ३२ आमदार आहेत. त्यापैकी १४ आमदार पदवीधर नसल्याने ते या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदारपद किंवा अन्य राजकीय पदापेक्षा मतदार म्हणून नोंदणीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेला महत्त्व असते. त्यामुळे विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या आमदारांना या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होता येणार नाही.

नागपुरातील पाच आमदारांचा समावेश

नागपूर जिल्ह्यातील पाच आमदार पदवीधर मतदारांच्या यादीबाहेर आहेत. यात मध्य नागपूरचे प्रवीण दटके, नागपूर पूर्वचे कृष्णा खोपडे, कामठीचे चंद्रशेखर बावनकुळे, काटोलचे चरणसिंह ठाकूर आणि नागपूर दक्षिणचे मोहन मते यांचा समावेश आहे. यापैकी प्रवीण दटके यांनी पदविका प्रथम वर्ष, कृष्णा खोपडे यांनी सातवी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बी.एस्सी. प्रथम वर्ष, चरणसिंह ठाकूर यांनी बारावी, तर मोहन मते यांनी आयटीआयपर्यंत शिक्षण घेतले आहे.

भंडारा-गोंदियात निम्म्याहून अधिक आमदार मतदानापासून दूर

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी चार आमदार पदवीधर मतदार नाहीत. यात साकोलीचे काँग्रेस आमदार नाना पटोले, तुमसरचे राजू कारेमोरे, गोंदियाचे विनोद अग्रवाल आणि आमगावचे संजय पुराम यांचा समावेश आहे. याशिवाय गडचिरोलीचे अहेरी मतदारसंघाचे धर्मरावबाबा आत्राम, चंद्रपूरचे किशोर जोरगेवार, ब्रह्मपुरीचे विजय वडेट्टीवार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे समीर कुणावार आणि देवळीचे राजेश बकाने यांनाही मतदान करता येणार नाही. या आमदारांची राजकीय समीकरणे आणि प्रचारातील भूमिका मात्र महत्त्वाची ठरणार आहे.

दोन खासदारही मतदानापासून वंचित

या निवडणुकीत दोन खासदारांनाही मतदान करता येणार नाही. राज्यसभेच्या खासदार माया इवनाते यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे, तर रामटेकचे लोकसभा खासदार श्यामकुमार बर्वे यांनी बी.ए. द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानासाठी संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आणि मतदार म्हणून नोंदणी असणे आवश्यक असल्याने केवळ लोकप्रतिनिधी असल्यामुळे मतदानाचा अधिकार मिळत नाही. त्यामुळे प्रचारात सक्रिय असलेले हे लोकप्रतिनिधी स्वतः मात्र मतदान प्रक्रियेपासून दूर राहणार आहेत.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.