अखेर मूलवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला!
अस्वल जेरबंद करण्यात वनविभागाला यश!
अखेर मूलवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला!
मूल, दीपक देशपांडे
मूल शहरांत काल रात्री उशिरा येथील पेट्रोल पंपावर एक अस्वल असल्याचे वृत्त गावभर पसरले आणि त्या पेट्रोल पंपावर नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती, तेंव्हा वनविभागाने मस्त प्रयासाने एका अस्वलीला पकडून त्याचे रेस्क्यू केले हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता , तेव्हा कुणाला याची कल्पनाही नव्हती की या अस्वलासोबत अजून एखाद दुसरे अस्वलही असू शकेल , त्यामुळे सगळेच निश्चिंत मनाने घरी जाऊन झोपी गेले.
मात्र पहाटे चार चे सुमारास भगतसिंग वार्डातील अरुण टेकाम लघूशंकेसाठी घराबाहेर आला असताना त्याला रस्त्यावर एक अस्वल चालत असल्याचे दिसून आले , त्यामुळे त्याने आपल्या परिचीत शेजारी व मित्र यांना याबाबत माहिती दिली आणि त्यांनी याची माहिती इतरांना दिली यावेळी ही अस्वल भगतसिंग वार्डातील छत्रपती संभाजी गणेश मंडळाच्या पेंडालजवळ पोहोचली होती आणि ती तिथे थोडी स्थिरावली होती , या वेळेपर्यंत अरुणचे मित्रमंडळी इथे जमा झाले होते ,हा आवाज ऐकून अस्वल सरळ मार्गाने दुप्पल्लीवार यांच्या घराजवळून गुजरी चौकाच्या दिशेने निघाली यावेळी समोरून येणाऱ्या अरुणच्या मित्राने आपल्या मोबाईलवर त्या अस्वलीचा फोटो काढून तो समाज माध्यमांवर टाकला व या परिसरात अस्वल असल्याचे सांगितले ,मात्र अरुण व मित्रपरिवार त्या अस्वलीचा पाठलाग करु लागले तेंव्हा ती अस्वल किसान चौकात येऊन पोहोचली तेव्हा गुजरी चौकातून कुणीतरी येत असल्याने अस्वलीने आपला मोर्चा मेनरोडने पोस्ट ऑफिस च्या दिशेने वळवला ,मात्र ती सरळ न जाता शिवकिराणा समोरच्या गल्लीत वळली, अरुण आणि मित्रमंडळी तीच्या मागावर होतेच, आणि अरुणचे काही मित्र संभाजी गणेश मंडळाच्या पेंडालजवळून आतील रस्त्याने याच दिशेने येत होते हे बघून बादल करपे यांचे घरासमोर रिकाम्या जागेतील झुडुपांकडे अस्वलीचे लक्ष गेले असावे ,तीने कंपाऊंड वॉल वरुन उडी घेऊन या झुडुपांचा सहारा घेतला आणि लपण्याचा प्रयत्न केला,हे दोन्ही बाजूने आलेल्या मित्रमंडळींनी बघितले, या वेळेपर्यंत ही बाब समाज माध्यम आणि दुरध्वनी द्वारे नगरसेवक प्रशांत समर्थ यांना माहिती झाली होती ते तातडीने घटनास्थळी पोचले होते आणि प्रशासनाला याबाबत माहिती दिली गेली होती आणि प्रशांत समर्थ यांनी समाज माध्यमांवर या परिसरात अस्वल असल्याचे वृत्त टाकले ,हे वृत्त बघताच आम्ही स्वतः डोक्यावर जाऊन शहानिशा केली व तातडीने *ब्रेकिंग न्यूज* दिली आणि बघताबघता प्रेक्षकांची घटनास्थळी तोबा गर्दी उसळली, पोलीस प्रशासन आणि वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची खात्री करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रेस्क्यू टिमला घटनास्थळी पाचारण केले व या चमूने चंद्रपूर वरुन घटनास्थळी धाव घेतली आणि बेहोशिचे इंजेक्शन देऊन अस्वलीला बेहोश करुन तेथून रेस्क्यू केले.
आणि...परिसरातील रहिवासी, जनता वनविभागाचे कर्मचारी व पोलिस अधिकारी यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
भरवस्तीत अस्वलीचा शिरकाव व पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अरुण टेकामच्या सतर्कतेमुळे एक अतिशय भयावह घटना घडण्यापासून बचाव करता आला ही बाब निश्चितच दखल पात्र ठरवावी, अशी परिसरातील रहिवासी आणि जागृत ग्राहक राजा सामाजिक ग्राहक संघटना नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी मागणी केली असून अरुण टेकामच्या या शौर्य(सतर्कते) बद्दल प्रशासनाने आणि नगरपालिका प्रशासनाने त्याचा उचित सन्मान करावा असेही सुचविले आहे.
वनविभागाच्या वनक्षेत्रातून बाहेर पडत वन्यजीव गावाच्या दिशेने येणे, आणि भरवस्तीत राजरोसपणे भ्रमंती करणे किती भयावह ठरु शकते आज अस्वल भरवस्तीत आले उद्या वाघाचा शिरकाव झाला तर काय? याचा विचार करण्याची आणि वन्यजीव वनक्षेत्र सोडून बाहेर पडू नयेत यासाठी वनविभागाने उचित कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत कित्येक नागरिकांनी याप्रसंगी आमच्या सोबत चर्चा करताना व्यक्त केले असून आतापर्यंत वाघ,बिबट, अस्वल कर्मवीर महाविद्यालय मूल परिसरात येत होती तो परिसर वनक्षेत्राला लागून असल्याचे सांगितले जात होते परंतू आता भगतसिंग वार्ड हा परिसर भरवस्तीत असल्याने हा प्रश्न एक गंभीर समस्या निर्माण करीत आहे. वनविभाग याबाबत काय भूमिका घेते याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment