मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियान
मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियान
प्रत्येक घरात दिवा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस साजरा करण्याचे भाजपा मूल शहरचे आवाहन
मूल : दीपक देशपांडे.
दिनांक १७/०९/२०२६ रोज गुरुवार संध्याकाळी ७.००वा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मूल शहरच्या वतीने ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरी एक दिवा प्रज्वलित करून मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद द्यावा, असे आवाहन भाजपा मूल शहरच्या वतीने करण्यात आले आहे.
सेवा, विकास आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. आपल्या घराच्या अंगणात अथवा प्रवेशद्वाराजवळ दिवा लावून या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मूल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करावा आणि मोदीजींचा वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेवा सप्ताह अभियान मूल अंतर्गत शहरातील अंगणवाडी सेविकेचा सन्मान,शालेय विद्यार्थी यांच्यासाठी भाषण स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,सामान्य ध्यान स्पर्धा,सेवा दीप यात्रा सारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment