मनस्वी कवयित्री प्रतिभा पुराणिक
मनस्वी कवयित्री
प्रतिभा पुराणिक
लेखक-कवी-कथाकथनकार मधुसूदन उपाख्य मदन पुराणिक यांच्या पत्नी प्रतिभा उपाख्य मेघा यांच्या निधनानं एक मनस्वी कवयित्री अकाली काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांचा एकच कवितासंग्रह, तोही ललित लेखांसह संयुक्त पुस्तक रूपात 'काव्य-चिंतन' या शीर्षकानं प्रसिद्ध झाला आहे. पण, तेवढ्यातूनही त्यांची 'प्रतिभा' सहज लक्षात येते.
'दिनचर्या' या कवितेत त्यांनी, सूर्यानं माणसांना केलेलं आवाहन नेमकं टिपलं ते असं-
रंगित रंगित फुले विविध ती
गंध सुगंधी सहज पसरला
प्राचिवरती दिनकर येऊन
'आळस सोडुन उठा' म्हणाला
अशा एक-दोन नव्हे, 40 कविता, अनेक चारोळ्या आणि 30 चिंतनं त्यांच्या पुस्तकात आहेत. चंद्रपूर आकाशवाणीनं प्रसारित केलेली काही चिंतनं वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर उत्साहित होऊन त्या कवितांकडे वळल्या. विशेष आजारग्रस्त मुलगा पियूष पदरात असताना या पतिपत्नीनं आपली लेखनकला जोपासली, हे त्यांच्या कलासक्तीचं निदर्शक आहे.
प्रतिभा पुराणिक 60 व्या वर्षी गंभीर आजारानं अकस्मात गेल्या नसत्या तर त्यांच्या आणखी साहित्याचा आस्वाद वाचकांना घेता आला असता. त्यांना चौदावीनिमित्त श्रद्धांजली👏💐
-@विनोद देशमुख.
'काव्य-चिंतन'चं मार्मिक मुखपृष्ठ
चित्रकार- सुदर्शन बारापात्रे
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment