मोठ्ठी बातमी मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस! दीपक देशपांडे मूल तालुक्यातील मौजा चिचाळा येथे मंगळवारी रात्री तीन अस्वलींनी गावात शिरुन नागरिकांमध्ये घबराट निर्माण केली. ग्रामस्थांनी गावात शिरलेल्या अस्वलींना जंगलाकडे पळवून लावण्यासाठी फटाके फोडून आणि जोरजोरात ओरडत त्या अस्वलींना सळो की पळो करून सोडले, परंतू त्या अस्वलीचा गावातील हैदोस आणि गावप्रदक्षीणा यामुळे नागरिकांना चांगलेच घाबरवून सोडले होते. याच अस्वलीने सुरेश कुनघाटकर यांच्या घरात शिरुन मध्यरात्री सुरेश कुनघाटकर यांचेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याचेही वृत्त हाती आले आहे. मूल तालुक्यात एकीकडे वाघाच्या हल्ल्याची वाढती प्रकरणे तर दुसरीकडे अस्वलीचा वाढता धुमाकूळ यांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाद्वारे नेमकी काय कारवाई केली जात आहे हा प्रश्न विचारला जात असून वनविभागाद्वारे या वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांची सुरक्षीत या वेशीवर टांगल्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व...
मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले. मूल, दीपक देशपांडे. मूल येथील अभिनय विभा विठ्ठल बोथले याने एमबीबीएस ची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण करीत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ.अभिनय ह्याचे १ली ते७वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, त्यानंतर वर्ग ८ते१०वी पर्यंतचे शिक्षण शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय व्याहाड खुर्द येथे झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या अभिनयला शिक्षणाची गोडी होती आणि तो अतिशय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत होता , त्यामुळे एकेकाळी दोन वेळेच्या खाण्याचे वांदे असलेल्या आईने एसटी महामंडळात कशीबशी नौकरी मिळवली आणि दिवस पालटत गेले आणि आजही एसटी महामंडळ मूल येथे कार्यरत आईने नौकरी च्या ठिकाणी मूल येथील नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूल येथे त्याचा अकरावीत प्रवेश घेतला ,कठोर परिश्रम घेत अभिनयने अकरावी बारावी ची परीक्षा सोबतच निटची परीक्षा देत दोन्ही परीक्षा...
२ वर्ष ६ महीण्यापुर्वी हरवलेल्या व्यक्तीचा मूल पोलीसांनी केरळ राज्यातुन घेतला शोध श्री. विजय राठोड, पोलीस निरीक्षक यांचे कार्यतत्परतेने हरवलेल्या व्यक्तीस नातेवाईकांशी मिळवणे झाले शक्य दीपक देशपांडे. मूल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथिल सौ लताबाई बंडू खोब्रागडे वय ५५ वर्ष यांनी दिनांक २२/०९/२०२३ रोजी तक्रारदार सौ लताबाई बंडू खोब्रागडे वय ५५ वर्ष राहणार बोरचांदली तालुका मुल जिल्हा चंद्रपूर यांनी तक्रार दिली की, त्यांचे पती बंडू बुधा खोब्रागडे वय ६० वर्ष रा. बोरचांदली तालुका मूल जिल्हा चंद्रपूर हे दिनांक ८/९/२०२३ रोजी कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेले त्यांचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने पोलीस स्टेशन मूल यथे मिसिंग क्रमांक ५१ / २०२३ प्रमाणे नोंद करण्यात आले. सदर हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना सदर व्यक्ती व्यक्ती हा पोन्नानी म्युनिसिपलिटी इमर्जन्सी केअर अँड रिकव्हरी सेंटर, पोन्नानी, राज्य केरला येथे उपचार घेत असल्याची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी तात्काळ पोलीस अंमलदार वेदनाथ करंबे ब. नं. ५८३ यांना शोधकामी पोन्नानी राज्य केरला येथे रवाना करून हरवलेला व...
एक चांगला उपक्रम.
ReplyDeleteकेवळ तुमच्या मुळे आम्ही गणपतींचे दर्शन घरी बसून घेऊ शकलो.धन्यवाद.
ReplyDelete