जि. प. शाळा फिस्कुटीच्या सहायक शिक्षिका वृंदा पगडपल्लीवार यांना 'जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका' पुरस्कार प्रदान.

 जि. प. शाळा फिस्कुटीच्या सहायक शिक्षिका वृंदा पगडपल्लीवार यांना 'जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका' पुरस्कार प्रदान



​चंद्रपूर: दीपक देशपांडे.

जिल्हा परिषद चंद्रपूर आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जि. प. शाळा फिस्कुटी येथील सहायक शिक्षिका श्रीमती वृंदा पगडपल्लीवार यांना 'जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२६'ने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज, शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील नियोजन भवन येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

​शिक्षणातील गुणात्मक वाढ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

वृंदा पगडपल्लीवार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रातून, फिस्कुटी ग्रामस्थांकडून तसेच त्यांच्या आप्तेष्टांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांना अधिक ऊर्जा मिळेल, अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.