स्पष्ट आणि परखड अमृता फडणवीसांनी आता "हे" काम करावे.

स्पष्ट आणि परखड

अमृता फडणवीसांनी आता "हे" काम करावे.



हिंदू धर्म हा सहिष्णु धर्म म्हणून ओळखला जातो. ज्याप्रमाणे ख्रिश्चन धर्मात त्यांचे सणवार उत्सव यात ते सर्वधर्मीयांना समाविष्ट करून घेतात, त्याप्रमाणेच हिंदू धर्मियांनी त्यांची दहीहंडी, गरबा इत्यादी सणांमध्ये सहिष्णुता दाखवत मुस्लिम धर्मियांना देखील ते श्रद्धेने येत असल्यास सहभागी होऊ द्यावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत असून ज्या विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सवात मुस्लिमांना सहभागी होऊ नये करून घेऊ नये असे आवाहन केले आहे त्यांनी अमृता फडणवीस यांच्या विधानाला विरोध देखील केला आहे. 

हिंदू धर्म हा सहिष्णूंचा धर्म आहे हे वास्तव कधीच नाकारता येणार नाही. सर्वधर्म समभाव हे हिंदुत्वाचे खरे लक्षण आहे. त्यामुळे हिंदूंनी आपल्या धर्मात इतरांनी यावे यासाठी कधी कोणावर बळजबरी केली नाही. तसेच आपल्या श्रद्धास्थानांमध्ये येण्यालाही कोणाला मनाई केलेली नाही. मात्र मधल्या काळात मुस्लिमधर्मियांनी जे लव्ह जिहादचे प्रकार केले, आणि त्यातून हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करणे, त्यांना बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडणे आणि मग त्यांना सोडून देणे असे प्रकार केले त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने मुस्लिमांना गरबामध्ये येण्यास मनाई करावी असे आवाहन केले आहे.

गरबा आणि दांडिया हे प्रकार मूळचे गुजराती समाजाचे आहेत. गुजरातमध्ये देवीच्या नवरात्रात स्त्री-पुरुषांनी एकत्र गरबा खेळून आदिशक्तीची आराधना करण्याची पद्धत आहे. त्यामुळे गुजरातेत नवरात्रीत गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

मुंबई हे शहर गुजरातपासून अतिशय जवळ आहे. राज्य पुनर्रचना होईपर्यंत गुजरात मुंबई आणि महाराष्ट्राचा काही भाग हे एक राज्यात होते. त्यामुळे मुंबईत गुजराती समाज मोठ्या संख्येत आहे. म्हणूनच मुंबईत देखील नवरात्रात गरबा खेळण्याची जुनी परंपरा आहे. विशेष म्हणजे हा गरबा तिथे सार्वजनिक स्वरूपात खेळला जातो. आता तर तो एक कार्पोरेट इव्हेंट म्हणून खेळला जात असून त्यात पैसा देखील बराच खर्च होत असतो. त्याच्या मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जात असून मग गरबा खेळण्यासाठी महागडे पोशाख आणि इतर साहित्य यावर देखील प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते.

या गरबा खेळाच्या निमित्ताने अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या संपर्कात येतात. पूर्वी मुंबईत फक्त गुजराती समाजच गरबा खेळायचा. हळूहळू इतर समाजही त्यात सहभागी होऊ लागले. त्यातूनच मग तरुण मुला-मुलींचा एकमेकांशी संपर्क होणे, मैत्री प्रस्थापित होणे आणि प्रसंगी मैत्रीपुढे जाऊन त्याचे प्रेमात रूपांतर होणे असेही प्रकार घडतात. आधी फक्त मुंबईत असलेला गरबा आता संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी होत असतो. परिणामी असे प्रेम प्रकार देखील महाराष्ट्रात ठीक ठिकाणी होत असतात‌ .

मुस्लिम धर्मीय हे अतिशय आक्रमक असून धर्मविस्तारासाठी अतिशय कडवे म्हणून ओळखले जातात. अल्पसंख्यांक असल्याने आधीच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी बऱ्याच सवलती देखील पदरात पाडून घेतल्या असून त्यातून ते आपला धर्म विस्तार आणि लोकसंख्या विस्तार देखील झपाटून करत आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी लव्ह जिहादचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या प्रकारात ते उपवर हिंदु तरुणींना गाठून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात  ओढतात. मग त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांना बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडतात. अन्य धर्मियांसाठी असलेला एक पत्नीत्वाचा कायदा मुस्लिमांना लागू नाही. त्यामुळे एकच तरुण अनेक तरुणींना या पद्धतीने फसवत असतो. या प्रकारात अनेक हिंदू तरुणी हकनाक बळी पडल्याचे आणि परिणामी त्यांचे आयुष्य बरबाद झाल्याचे आढळून आले आहे. गरबा आणि दांडिया या प्रकारात अशी प्रकरणे लव जिहाद्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडल्याची आढळून आले आहे. म्हणूनच विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना मुस्लिम तरुणांना गरब्यात येण्यासाठी विरोध करत आहेत. 

आज-काल बहुतेक मोठ्या गरबा उत्सवात तिकिटे लावूनच प्रवेश दिला जात असतो. तिकिटे काढल्यावर देखील गरबा उत्सवात येणाऱ्या तरुणांचे आधार कार्ड तपासावे तसेच गरब्यात यायचे असेल तर त्या तरुणाने कपाळावर हिंदू पद्धतीने गंध लावलेले असावे हे बघावे असे आवाहन करणारे पत्रक विश्व हिंदू परिषदेने मुंबईत काढले आहे. आधार कार्ड नुसार मुस्लिम तरुणांना गरबा उत्सवात प्रवेश देऊ नये, तसेच जे कपाळाला गंध लावून घेण्यास तयार नसतील त्यांनाही प्रवेश देऊ नये असे त्यांनी या आवाहनात म्हटले आहे. (कट्टर मुस्लिम कपाळाला हिंदू पद्धतीने गंध लावून घेण्यास कधीच तयार नसतात)

विश्व हिंदू परिषदेच्या या आवाहनावर बरेच राजाकीय वाद सुरू झाले आहेत. शिल्लक शिवसेनेचे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुस्लिमांना कोण गरबा उत्सवात अडवते हे बघतो अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे हा नवीन वाद होणार असे चित्र दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी वरील विधान केले आहे. 

मुस्लिम श्रद्धेने येऊन असतील तर त्यांना येऊ द्यावे असे अमृता फडणवीस म्हणतात. मात्र ते श्रद्धेने येत आहेत की लव्ह जिहाद च्या मनसुभ्याने हे कसे ठरवायचे, त्यासाठी निकष कोणते आणि कसे लावायचे हे देखील अमृता फडणवीस यांनी स्पष्ट करावे. तसेच ते श्रद्धेने येत असतील तर त्यांच्या श्रद्धेचा मापदंड कोणता हे देखील ठरवण्याची गरज पडणार आहे. श्रद्धेचे नाटक करून ते गरब्यात आले आणि तिथे हिंदू तरुणींना हेरून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तर त्याला जबाबदार कोण हे देखील अमृता फडणवीस यांनी सांगायला हवे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यावर त्या तरुणीच्या प्रेमासाठी सदर मुस्लिम तरुण हिंदू* धर्मात येणार आहे का? तो जर हिंदू धर्मात येणार असेल तर त्याचे स्वागतच होईल. मात्र तो जर एका हिंदू मुलीला मुस्लिम व्हावे म्हणून आग्रह धरणार असेल, त्यासाठी तो बळजबरी करणार असेल आणि तिचा छळ करणार असेल, तर ते हिंदूंनी मान्य करावे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. 

अमृता फडणवीस यांनी हिंदूंच्या सहिष्णुत्वाचा दाखला देत कोणी श्रद्धेने येत असेल तर त्याला येऊ द्यावे असे आवाहन निव्वळ भाबडेपणाने केले की त्यामागे काही अजून कारणे आहेत हे देखील स्पष्ट व्हायला हवे. या संदर्भात माझी अमृता फडणवीस यांनाच एक सूचना आहे. लव जिहाद या प्रकरणात मुस्लिम तरुण हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना मुस्लिम बनवतात. त्या ऐवजी अशा प्रकारे गरबात मैत्री आणि नंतर प्रेम संबंध प्रस्थापित होत असलेल्या हिंदू तरुणी आणि मुस्लिम तरुणांच्या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सदर तरुणी मुस्लिम होण्याऐवजी त्या तरुणालाच हिंदू धर्मात आणण्याचे यशस्वी प्रयत्न करावे. तसे जर झाले तर सर्वच हिंदू धर्मीय सुखावतील. तसेही भारतातील बहुसंख्य मुसलमान हे मूळचे हिंदुच होते. त्यामुळे अशा प्रकारात त्या मुस्लिमांची घरवापसी करता येईल.

 अमृता फडणवीस या मुळातच सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे या पद्धतीने गरब्याच्या माध्यमातून किंवा अन्य इतर माध्यमातून हिंदू तरुणी आणि मुस्लिम तरुण यांचे प्रेम संबंध जुळले आणि विवाहानंतर सदर तरुणी मुस्लिम होणार असेल, तर ते थांबवून त्या तरुणालाच हिंदू धर्मात आणण्यासाठी काहीतरी योग्य असे नियोजन करावे असे सुचवावेसे वाटते. तसे जर झाले तर विश्व हिंदू परिषद या प्रकाराला कधीच विरोध करणार नाही आणि हिंदू धर्मासाठी महत्त्वाचे काम हाती घेतल्याबद्दल  देशातील असंख्य हिंदू अमृता फडणवीस यांचे शतशः आभारी राहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 


✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.