ऊर्जानगरात चिमूर आष्टी ऑगस्ट क्रांतिवीरांना वाहिली श्रद्धांजली......
ऊर्जानगरात चिमूर आष्टी ऑगस्ट क्रांतिवीरांना वाहिली श्रद्धांजली......
चंद्रपूर (ऊर्जानगर):-दीपक देशपांडे.
चातुर्मासाच्या कार्यक्रमात राष्ट्रसंतांनी " झाड झडले शस्त्र बनेंगे,पत्थर सारे बॉम्ब बनेंगे,भक्त बनेगी सेना, नाव लगेगी किनारे" या भजनाने चिमुरकराच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविली. १६ ऑगस्ट १९४२ ला प्रचंड उद्रेकासह चिमूर वासियांनी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयावर मुक मोर्च्या नेला. इंग्रजाच्या संगिनीला व बंदुकीच्या गोळीला न जुमानता चिमूर वासियांनी चिमुरला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले. अशा प्रकारे १६,१७ व १८ ऑगस्ट १९४२ असे तीन दिवस इंग्रजाच्या गुलामगिरीतून संपूर्ण स्वतंत्र झालेले देशातील पहिले गाव म्हणजे चिमूर होय.चिमूर स्वातंत्र्य झाल्याची घोषणा नेताजी सुभाष सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून केली व संपूर्ण जगात चिमूरचे नाव अमर झाले.सन १९४२ च्या चिमूर आष्टी ऑगस्ट क्रांतीचे जनक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा सदर क्रांतीत समावेश असलेल्या क्रांतिवीरांच्या त्यागाची, बलिदानाची आपल्याला व येणाऱ्या नवीन पिढीला आठवण राहावी त्यांच्या विचारांचे पुनः बीजारोपण व्हावे या हेतूने श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रसंत आगस्ट क्रांतीपर्व स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर दरेकर अध्यक्ष श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर होते तर उद्घाटक मा.नंदकिशोर चन्ने उपमहाव्यवस्थापक (मा. स) चंद्रपुर महाऔष्णिक विज केंद्र,मुख्य मार्गदर्शक मा.दयाराम ननावरे ग्रामगीताचार्य तथा सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी चंद्रपूर ,प्रमुख अतिथी बोबडे अध्यक्ष चंद्रपूर वीज केंद्र कर्मचारी सह पतसंस्था ऊर्जानगर, मा.वैशाली डुडुरे अध्यक्षा श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ ऊर्जानगर यांची उपस्थिती होती.
अधिष्ठानाला व वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज,कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.
यावेळी उदघाटक चन्ने साहेब यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व रितसर उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.प्रमुख वक्ते दयाराम ननावरे यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला देऊन आगस्ट क्रांतीचे सविस्तर असे वर्णन केले. शंकर दरेकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून चिमूर आष्टीऑगस्ट क्रांतीची माहिती दिली व १९ फेब्रुवारी हा वं तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत उपाधी मिळालेला दिवस पुढे साजरा करण्यात येईल असे सांगितले.
या कार्यक्रमात ग्रामगीताचार्य पदवी प्राप्त दयाराम ननावरे व नंदकिशोर चन्ने यांना मान्यवरांच्या हस्ते शाल,स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाजी बावणे यांनी केले.
तर आभार हरीचंद्र देवतळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गुरुदेव प्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment