मूल तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय पडोळे

 मूल तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय पडोळे तर सचिवपदी भोजराज गोवर्धन.



नवीन कार्यकारिणी गठीत

मूल:- दीपक देशपांडे.

 मूल येथील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  संजय पडोळे तर, सचिव पदी भोजराज गोवर्धन यांची अविरोध निवड करण्यात आली.उपाध्यक्ष म्हणून गुरू गुरनूले आणि सहसचिव म्हणून रमेश माहुरपवार यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्ष पदाची निर्मिती करून त्या पदावर जेष्ठ सदस्य चंद्रकांत मणियार यांची निवड करण्यात आली.तालुका पत्रकार संघाची रविवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी सर्वसाधारण सभा पार पडली.त्यात नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष राजू गेडाम हे होते. कार्यकारिणी सदस्य म्हणून दीपक देशपांडे, राजू गेडाम,युवराज चावरे, वासूदेव आगडे,अशोक येरमे,गंगाधर कुनघाडकर,रविंद्र बोकारे, विजय पाकमोडे,विनायक रेकलवार यांचा समावेश राहणार आहे.यावेळी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मावळते अध्यक्ष राजू गेडाम, उपाध्यक्ष युवराज चावरे,चंद्रकांत मणियार यांनी मनोगत सादर केले.नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पडोळे यांनी यावेळी पत्रकार संघाचे आभार व्यक्त करीत पत्रकार संघाची वाटचाल यापुढेही यशस्वीरित्या कायम राहील अशी ग्वाही दिली. सर्वांचे आभार मावळते सचिव विनायक रेकलवार यांनी मानले.स्नेहभोजनाने सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.