शालेय विद्यार्थ्यांना आधार प्रमाणीकरण आवश्यक!
शालेय विद्यार्थ्यांना आधार प्रमाणीकरण आवश्यक!
मूल, दीपक देशपांडे.
तुमच्या मुलाचे आधार ‘एमबीयू’ आहे का? तर मग हे आधी करा,अन्यथा भविष्यात येऊ शकते अडचण
वय वर्षे पाच ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे मँडेटरी बायोमेट्रिक अपडेट अर्थात एमबीयू मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. ही प्रलंबितता तातडीने दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने तालुकास्तरावर विशेष आधार शिबिर आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र, वारंवार सूचना करूनही अपेक्षित प्रमाणात एमबीयू झाले नाही. त्यामुळे आता मिशन मोडवर एमबीयू करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहे. पालकांनीही सजग राहून आपल्या मुलांचे एमबीयू अपडेट आहे की नाही, याकडे लक्ष द्यायला हवे.
आधार कार्डमध्ये एमबीयू ही एक अत्यंत महत्त्वाची आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. मुलांचे वय ५ वर्षे आणि १५. वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांच्या हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन, नवीन फोटो आधार कार्डमध्ये अपडेट करणे बंधनकारक असते, यालाच एमबीयू म्हणतात. जर मुलांचे हे अपडेट वेळेत केले नाही, तर अडचणी येऊ शकतात. आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकते. वय ७ वर्षे किंवा १५ वर्षे उलटून गेल्यावरही एमबीयू केले नाही, तर मुलांचे आधार कार्ड तात्पुरते बंद किंवा रद्द केले जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांचे आधारकार्ड एमबीयू आहे की नाही याची पडताळणी करणे आवश्यक आहे. शाळा स्तरावरूनदेखील ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे.
प्रलंबित असलेले एमबीयू प्राधान्याने पूर्ण करा
शाळा, महाविद्यालयामध्ये आयोजित शिबिरात ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले एमबीयू प्राधान्याने पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतर मुख्याध्यापक, प्राचार्याकडून एमबीयू शिबिर आयोजित केल्याचे प्रमाणपत्रही आधार केंद्र चालकांना घ्यावे लागत आहे. प्रलंबित असलेले एमबीयू ऑगस्ट महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे..
नुकसानही होण्याची भीती सरकारने शाळांमधील यू-डायस पोर्टलवर सर्व विद्याथ्र्यांची एमबीयू स्थिती तपासणे अनिवार्य केले आहे. एमबीयू प्रलंबित असल्यास शालेय रेकॉर्डमध्ये अडचण येऊ शकते.
* आधार कार्ड लिंक नसल्यास किंवा निष्क्रिय झाल्यास मुलांना मिळणाऱ्या शासकीय स्कॉलरशिप, सायकल वाटप, मोफत गणवेश, इतर भत्ते मिळणे थांबेल.
इयत्ता १० वी, १२ वीचे बोर्ड फॉर्म ३ किंवा पुढील प्रवेश परीक्ष फॉर्म भरताना आधार बायोमेट्रिक मॅच न झाल्याने फॉर्म नाकारला जाऊ शकतो.
मुलांचे वय वाढत असतानात्यांच्या चेहऱ्यात फरक पडतो.हाताच्या रेषाही आधार मॅच होणे
आवश्यक असते. अनेकदा एमबीयू न केल्याने योजनांचा लाभ घेताना मिसमॅचची अडचण येते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment