सहज सुचलं म्हणून... स्वातंत्र्यदिन: प्रतिमा आणि वास्तव..
सहज सुचलं म्हणून...
स्वातंत्र्यदिन: प्रतिमा आणि वास्तव..
१५ ऑगस्ट २०२६, आज भारत देश स्वतंत्र होऊन ७९ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आज भारत एक जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे प्रत्येक भारतीय आज अभिमानाने नमूद करतो आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अहिंसेच्या मार्गाने असा दावा केला जातो. "दे दी हमे आजादी बिना खडग् बिना ढाल.. साबरमती के संत तुने कर दिया कमाल.." असे एक गीत देखील गायले जाते. मात्र खरोखरी स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने मिळाले आहे का हा देखील प्रश्न विचारणारा एक वर्ग आहे. त्याचप्रमाणे देशाला खरोखरी स्वातंत्र्य मिळाले की ब्रिटिशांचे मांडलिकत्व मिळाले असाही प्रश्न उपस्थित केला जातो. आज याच मुद्द्यांवर आपण विचार करणार आहोत.
२०२० मध्ये चित्रपट अभिनेत्री आणि भाजपच्या आजच्या खासदार कंगना राणावत यांनी १५ ऑगस्ट १९४७ ला मिळाले, ते खरे स्वातंत्र्य नव्हते, तर २०१४ मिळालेले मध्ये मिळालेले खरे स्वातंत्र्य होते, असे विधान केले होते. त्यावरून देशात बराच गोंधळही झाला होता. मात्र त्यावेळी अभ्यास केल्यावर बरीच वस्तुस्थिती समोर आली होती. ती खरी वस्तुस्थिती १९४७ मध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांनी देशासमोर ठेवलीच नाही असाही दावा केला जातो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १८ व्या आणि १९ व्या शतकात इंग्रजांनी जगाच्या बराचशा बऱ्याचशा भूभागावर आपले साम्राज्य बसवले होते. मात्र नंतर ते त्यांना सांभाळणे कठीण होत होते, त्यामुळे त्यांनी कॉमनवेल्थ राष्ट्रसमूह बनवला आणि त्यातील देशांना मर्यादित स्वायत्तता देण्याचा १९४७ मध्ये निर्णय घेतला. त्यातही मोठ्या देशांचे त्यांनी तुकडे देखील केले होते त्यात तत्कालीन हिंदुस्तानचे सिलोन, ब्रह्मदेश, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मूळचा भारत असे तुकडे त्यांनी पाडले होते. १९४७ मध्ये त्यांनी या सर्व देशांना मर्यादित स्वायत्तता दिली. त्यात भारतही एक होता. त्यामुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पुढली तीन वर्षे ब्रिटनचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताच्या राज्यकारभारावर अंकुश ठेवून होते. १९५० मध्ये भारताचे प्रजासत्ताक घोषित झाले. त्यानंतर माउंटबॅटन इंग्लंडमध्ये परत गेले होते.
भारताचे प्रजासत्ताक घोषित झाल्यावर जगातील इतर सर्व देशांनी आपले दूतावास भारताच्या राजधानीत उघडले होते. भारताने देखील इतर सर्व देशांमध्ये आपले दूतावास सुरू केले होते. मात्र ब्रिटनमध्ये आपले दूतावास उघडले नव्हते आणि आजही नाही. त्या ऐवजी भारतात ब्रिटनचे हाय कमिशनर आहेत आणि ब्रिटनमध्ये देखील भारताचे हाय कमिशनर आहेत. ब्रिटनच्या कॉमनवेल्थ राष्ट्र समूहात जे जे देश समाविष्ट केले, तिथे नेमकी हीच परिस्थिती आहे. म्हणजे इंग्लंडने संपूर्ण स्वातंत्र्य दिले नव्हते तर मर्यादित स्वायत्तता दिली होती, आणि तीच कायम ठेवली असा निष्कर्ष काढता येतो.
इंग्रज भारतातून गेल्यानंतरही पुढली अनेक वर्षे दरवर्षी भारताला इंग्लंडच्या राणीला नजराणा म्हणून काही कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागत असे. तसेच सुरुवातीची काही वर्षे इंग्लंडची ब्रिटिश रॉयल आर्मी इंग्रज भारतात सोडून गेले होते. तिच्यावरही दरवर्षी काही करोड रुपयाचा खर्च भारताच्या खजिन्यातून होत असे. याचे पुरावे उपलब्ध होऊ शकतात. काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने देशाच्या स्वातंत्र्य समयी झालेल्या हस्तांतराचा अभ्यास करून डिलीट ही पदवी मिळवली आहे. आपल्या अभ्यासात त्याने ही माहिती नमूद केल्याचे कळते.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेता १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला मिळालेले खरे स्वातंत्र्य नव्हते, हा अभिनेत्री कंगना राणावत यांचा दावा अगदीच काही तकलादु मानता येत नाही. मात्र या विषयावर अजून अभ्यास होणे आणि वास्तव समोर येणे आजही गरजेचे आहे.
देशाला स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळाले हा देखील एक दावा केला जातो. महात्मा गांधींनी सत्याग्रह केला. चले जाव आंदोलन केले. मिठाचा सत्याग्रह केला. या सर्व गोष्टी नाकारता येत नाही. मात्र त्याचवेळी सरदार भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, चाफेकर बंधू अशा अनेकांनी केलेले हिंसक हल्ले त्यातून इंग्रजांवर निर्माण केलेली दहशत ही देखील नाकारता येत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्यांनी अंदमानमध्ये ज्या काही यातना भोगल्यात, त्या देखील नाकारता येत नाहीत जालियनवाला बाग मध्ये किंवा मुंबईला अगस्त क्रांती मैदानावर झालेले अत्याचार देखील इतिहासात नोंदले गेले आहेतच. त्यामुळेच फक्त अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून आणि चलेजाव आंदोलन करून स्वातंत्र्य मिळाले हे देखील अर्धसत्यच आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी रक्त सांडले आहे. घरदार आणि संसाराची होळी केलेली आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांनी काही विशिष्ट व्यक्तींचाच उदो उदो केला. बाकीच्यांना झाकून ठेवले हे वास्तव देखील विचारात घ्यायलाच हवे.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment