मूल पोलिसांची मोठी कारवाई : प्रतिबंधित तंबाखू मुद्देमालासह केला जप्त.
मूल पोलिसांची मोठी कारवाई : प्रतिबंधित तंबाखू मुद्देमालासह केला जप्त.
मूल दीपक देशपांडे.
मूल पोलिसांनी अवैध सुगंधित व खुल्या तंबाखूच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ६ लाख ९९ हजार ७५० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. या प्रकरणी वाहनचालक राहुल हिरालाल मल्लेवार २६ वर्ष रा. गोरेगाव जिल्हा. गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासनामार्फत सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार ६ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, पोलीस हवालदार पंकज बगडे व मूल पोलीस पथक मरेगाव–आकापूर परिसरात अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते.
त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून गोंदिया येथून मूलकडे एका बोलेरो पिकअपमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित व खुल्या तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे एमआयडीसी परिसरातील उमा नदी नाक्यावर सापळा रचण्यात आला. संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप क्रं. एमएच ३५ एजे ३५९५ अडवून तपासणी केली असता वाहनाच्या डाळ्यात वरच्या बाजूला कॅरेट ठेवून त्याखाली अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेला सुगंधित हुक्का शिषा तंबाखू आणि खुल्या तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान ३० किलो सुगंधित हुक्का शिषा तंबाखू किंमत ३९ हजार ७५० रुपये, २० प्लास्टिक चुंगड्यांमध्ये भरलेला खुला तंबाखू किंमत १ लाख ६० हजार रुपये तसेच ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ९९ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, पोलीस हवालदार पंकज बगडे व मूल पोलीस पथकाने केली,मूल पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांच्या कार्याची स्तुती केली जात आहे आणि परिसरातील युवकांना अवैध तंबाखू चे सेवन करण्यापासून परावृत्त केल्याबाबत अभिनंदनही , म्हणून ही कारवाई दखलपात्र ठरत आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment