विश्व आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण व अवयवदान जागरूकता
विश्व आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण व अवयवदान जागरूकता
मूल, दीपक देशपांडे.
दि . ९/०८/२०२६ रविवारला वैद्यकीय अधिक्षक डॉ. सरताज पठाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मूल येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण करुन अवयवदान जागरुकता करण्यात आली .
"निसर्गाशी आत्मीयता, अवयवदान जागरुकता" हा संदेश देऊन वृक्ष जसा फळे, फुले, प्राणवायू देऊन मानवी जिवन फुलवितो तसे मानवाने मरणोपरांत अवयवदान करून इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवावा, असे सांगून अवयवदानाची शपथ घेण्यात आली .. या प्रसंगी वसतिगृहाचे अधिक्षक प्रशांत फरकाडे , विजया शिवणकर (S.N.), शैलजा कोकंटी(L.T.) , ममता शेन्डे (Counsellor)तसेच वसतिगृहातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment