बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

 बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

मूल : दीपक देशपांडे.

भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे ध्वजारोहक तथा अध्यक्ष म्हणून ऍड अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, मूल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून शिवानी चपरिया शैक्षणिक संसाधन आणि करिअर समुपदेशक, रत्नसागर पब्लिकेशन, नागपूर आणि प्रमुख अतिथी म्हणून शशिकांत धर्माधिकारी सचिव शिक्षण प्रसारक मंडळ मूल, विवेक मुत्यलवार नगरसेवक नगर परिषद, मूल, क्षितिज ठाकरे सहाय्यक व्यवस्थापक, रत्नसागर पब्लिकेशन, नागपूर, धीरज शेंडे शाळा व्यवस्थापन समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल, विनोद बोलीवार प्राचार्य बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल, कुमार शक्य लाकडे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी नव्या पेंदोर विद्यार्थिनी प्रतिनिधी मंचवार उपस्थित होते यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची राष्ट्रीय पातळीवरील संकल्पना ‘युवा शक्ती फॉर विकसित भारत@2047’ आणि ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणाशी जोडलेली आहे.

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे ही स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत, विद्यार्थ्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध देशभक्तीपर उपक्रम सादर करण्यात आले.तसेच शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार यांनी विद्यार्थांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले तसेच सर्व उपस्थित  मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर तिरंग्याच्या रंगांनी आणि देशभक्तीच्या घोषणांनी भारून गेला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले.भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.

“तिरंगा सदैव उंच फडकत राहो, भारत माता सदैव वैभवशाली राहो!”असे अहवान करण्यात आले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोषी जयस्वाल, नेहा खेडुले यांनी केले आणि आभार प्रदर्शन ययाति चांदेकर यांनी केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्र गाण्याने झाली .

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.