कर्मवीर महाविद्यालय मूल येथे‘घर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन
कर्मवीर महाविद्यालय मूल येथे‘घर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन
मूल : दीपक देशपांडे.
शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय छात्रसेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘घर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात NCC कॅडेट्स, NSS स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस NSS स्वयंसेवक आणि NCC कॅडेट्स यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर तिरंगा ध्वज हातात घेऊन विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्याचा संदेश दिला. विविध फलक आणि तिरंगा ध्वजांच्या माध्यमातून ‘घर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘घर घर तिरंगा, हर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. रॅलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी NCC अधिकारी डॉ. उज्वला कापगते, NSS अधिकारी डॉ. प्रविण उपरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. राहुल बोधे, प्रा. अनिल शेलेकर NSS अधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘घर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासोबतच प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेम आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment