आज होणार प्रकाशन सोहळा, त्यानिमित्ताने ....अविनाश जी, तुस्सी ग्रेट हो...रवी गुळकरी यांच्या फेसबुक वालवरुन....

 आज होणार प्रकाशन सोहळा.त्यानिमित्ताने...

अविनाश जी, तुस्सी ग्रेट हो... रवी गुळकरी यांच्या फेसबुक वालवरुन....


आज ही भिंत माझे मार्गदर्शक अविनाश जी पाठक यांच्या सन्मानाकरिता... अविनाश जी सर्वपरिचित... कौन नहीं जानता-पहचानता इन्हे...??? पत्रकार आणि पत्रकारच ही त्यांची खरी ओळख... अविनाशजी चलचित्र कैमेरागिरी करण्यात अव्वल, ही त्यांची विशेष गुणवत्ता अनेकांना माहिती नाही... ते 'रामटेकच्या गडावरुन' या अनियकालिकाचे संपादकही आहेत, आणि कुशल संघटकही... याशिवायही ते बरेच काही आहेत...

आज मी ही जी भिंत लिहितोय ती याकरिता की, आज अविनाशजींनी लिहिलेली 3 पुस्तकं एकाच वेळी प्रकाशित होताहेत... हे असं, एकाच वेळी तीन तीन पुस्तकं प्रकाशित होण्याची, त्यातही एकाच लेखकाची प्रकाशित होण्याचा प्रसंग दुर्मिळातला दुर्मिळ आहे... मला अविनाशजींमधलं महत्वाचं हे वाटतं, कू, अविनाशजी माणसं वाचतात, आणि अचूक टिपतात... केवळ टिपत नाहीत, तर त्यांच्यावर लिहितात... नुसतं लिहित नाहीत, तर ही माणसं पुस्तक रुपानं अजरामर करतात... खरं लिहितोय, हे असं प्रत्यक्षात आणणं सोपं नाही... 

तोंडावर एकमेकांना शिव्या देणारे आपण, एकमेकांची निंदा करणारे आपण, परस्परांविषयी कृतघ्नपणे बोलणारे आपण असताना, या जगात अविनाशजींसारखी अविनाशी चांगुलपणा पेरणारी माणसं बघितली, की हायसं वाटतं. दिलासा मिळतो... अविनाशजींच्या वयाचं जाऊ द्या, त्यांच्या हातातली काठी विसरा, हे महाशय चिरतरुण आहेत...अनुभव कदाचित पंच्याहत्तरी किंवा ऐशीचा असेलही, पण त्यांचं लिखाण षोडष् वर्षीय आहे, हा माझा दावा आहे...

बरं, अविनाशजी फक्त गेडबोलंच लिहितात का...??? तर उत्तर आहे नाही... मूग गिळून गप्प बसणारे मी सतत अनुभवले, पण प्रसंगी अविनाशजी भूमिका घेतात, शब्दाचा चाबूक त्यांच्या हाती असतो, ते बेपर्वा होऊन आसूड ओढतात... अविनाशजींची ही भूमिका मला, त्यांच्या विविध भूमिकेत, सर्वाधिक भावते... आपल्या सभोवताल का कमी लेखक आहेत..???, कमी साहित्यिक आहेत...???, कमी कवि आहेत...??? कमी चिंतक आहेत...??? यापैकी कितीकांना भूमिका आहेत...??? किती जणांनी भूमिका घेतली आहे....??? अविनाश जी भूमिका घेतात, ही त्यांची भूमिका समाजस्वास्थ्याच्या जाणिवेतून असते...

लय लिहिलं... आपल्यालाही अविनाशजींबद्दल असंच काहीसं वाटत असणार... आपणही या भिंतीवर व्यक्त होऊ शकता... खरं तर मला अविनाशजींवर ग्रंथच लिहायचाय्... लिहिन... तुर्तास, शब्द/अक्षर साधक अविनाशजींच्या साधनेला नमन करतो... पुस्तक प्रकाशन समारंभाला शुभेच्छा देतो...आणि आज संध्याकाळी मिळून सारे आपण या पुस्तक प्रकाशन समारंभात भेटू या, असं आवाहन करतो... अविनाशजी, ते 'च्या'चं तेवढं जमवा बावा...

या पुस्तक प्रकाशन समारंभाची पत्रिका वर चिटकवली आहे... जरुर या...

अविनाशजी, त्रिवार अभिनंदन हो...

श्रीगुरुदेव दत्त 

@ निसर्गदत्त

दि. १६/७/२६

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.