दिनविशेष. 'आषाढस्य प्रथम(द्वितीय) दिवसे'

 दिनविशेष.

'आषाढस्य प्रथम(द्वितीय) दिवसे'

दीपक देशपांडे 

 मराठीत 'आषाढस्य प्रथम दिवसे' म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कवी कालिदासांच्या 'मेघदूता'तील ओळींच्या संदर्भात प्रसिद्ध आहे. 'आषाढस्य प्रथम दिवसे' या ओळींमुळे हा दिवस कालिदास दिन म्हणूनही ओळखला जातो, असे काही मराठी वृत्तपत्र संकेतस्थळांनी सांगितले आहे. 

'आषाढस्य प्रथम दिवसे' या ओळी 'मेघदूत' या काव्याच्या सुरुवातीला येतात. या ओळींचा अर्थ असा आहे की, "आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी". कालिदासाच्या या प्रसिद्ध ओळींमुळे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे काही मराठी बातम्यांच्या संकेतस्थळांनी म्हटले आहे. 

'आषाढस्य प्रथम दिवसे' चा अर्थ आणि संदर्भ:

आषाढस्य प्रथम दिवसे:

याचा अर्थ 'आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी' असा होतो.

मेघदूत:-ही कालिदासाची प्रसिद्ध रचना आहे, ज्यामध्ये एका यक्षाने आपल्या पत्नीला पाठवलेला संदेश मेघाद्वारे पाठवल्याची कथा आहे.

कालिदास दिन:-आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाला 'कालिदास दिन' म्हणूनही ओळखले जाते, कारण 'मेघदूत' या काव्याची सुरुवात 'आषाढस्य प्रथम दिवसे' या ओळींनी होते, असे  अभ्यासांती अनेक मराठी संकेतस्थळांनी म्हटले असल्याचे निदर्शनास आले.

महत्व:-आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाला कालिदासाच्या कार्यामुळे आणि 'मेघदूत' या काव्यामुळे मराठी साहित्यविश्वात विशेष महत्त्व आहे, असे अनेक मराठी संकेतस्थळांनी नमुद केले आहे.

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मेघदूत हे त्याचं महान काव्य. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. कालिदासाची जन्मतिथी माहिती नसल्याने त्याच्या काव्यातल्या या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला जातो. 

त्या निमित्ताने मेघदूताच्या काही अनुवादांविषयी…आषाढ महिन्याचा पहिला दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. ‘मेघदूत’ हे त्याचं महान काव्य. पत्नीविरहामुळे व्याकुळ झालेला एक यक्ष मेघाबरोबर स्वतःच्या पत्नीला संदेश पाठवतो, या कल्पनेवर मेघदूत हे काव्य रचलेलं आहे, हे सर्वश्रुत आहे. मंदाक्रांता वृत्तात केलेल्या या रचनेत प्रत्येकी चार चरणांची १११ कडवी आहेत. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत हे काव्य विभागलेलं आहे. या काव्याने अनेक कवी-लेखकांना भुरळ पाडली, प्रेरणा दिली. इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकात या काव्याची निर्मिती झाली असावी, असा अंदाज आहे. या काव्यावर सुमारे नव्वद भाष्यं किंवा टीका प्रसिद्ध झाल्या आहेत. तसंच, अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवादही झाले आहेत.

त्याच प्रमुख अनुवादांचा परामर्श आम्ही  यांत घेतला आहे. 

अनेकांना प्रेरणा देणारं असं महान काव्य रचणाऱ्या कालिदासाला वंदन!

कालिदासाची महती सांगणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे. तो असा –

पुरा कविनां गणनाप्रसंगे।

कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः ।।

अद्यापितत्तुल्यकवेर्अभावात् ।

अनामिका सार्थवती बभूव ।।

त्याचा भावार्थ असा :

पूर्वी एकदा महान कवींची गणना करण्याचे काम सुरू झालं. हाताच्या बोटांवर करंगळीपासून ते मोजायला सुरुवात झाली. पहिलं नाव अर्थातच महाकवी कालिदासाचं होतं; मात्र त्यानंतर अजूनही त्याच्या तोडीचा असा कोणी कवी सापडलेला नाही. त्यामुळे ‘अनामिका’ (करंगळीनंतरचं बोट) हे नाव सार्थ झालं.

अशा या महान कवीच्या महान काव्याच्या रचनेच्या   आजच्या दिवसाची आठवण ताजी करुन त्या काव्यपंक्तीतील भावार्थ शोधून त्याची आजच्या प्रेमाशी तुलना करण्याची आणि प्रेमाची महती  समजून घेण्याची किती आवश्यकता आहे,हे पटवून देणे केवळ अशक्यच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .

मात्र यावर्षी पावसाने घेतलेल्या प्रदिर्घ विश्रांती मुळे काल आषाढ महिन्यातील पहिल्या दिवशी हा लेख प्रसिद्ध करायला मन धजले नाही....आणि लिहून तयार असलेल्या ह्या लेखाला बोर्डवर तसेच ठेवावे लागते की काय?         हा प्रश्न उभा ठाकला होता, परंतु रात्रीतून अचानक असा बदल घडून आला की आजची सकाळ नभ मेघांनी आक्रंदिले म्हणत ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि पहाटेच्या वेळी अल्पसा पाऊस सुरू झाला आकाशात ढगांनी गर्दी केली आणि हवेच्या वेगाने त्या ढगांना गती प्राप्त झाली आणि......हा लेख प्रसिद्ध न केला तर मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक नसल्याची खंतही राहील असे वाटू लागले आणि म्हणूनच हा लेखनप्रपंच.

इतिहासातील घटनांची पुनरावृत्ती आपण नेहमी बघत असतो आणि त्यांनी निर्माण केलेल्या संदर्भांची शहानिशा करून तत्कालीन विचार सत्य असत्य यावर मंथन ही करीत असतोच पण....काल सायंकाळ पर्यंत आपण कल्पना करू शकत नसतांना रात्रीतून झालेला हा बदल बरेच काही संदर्भ बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

असो , कालच्या स्वप्नांना आज सत्यात उतरु द्या, आज बरसणाऱ्या जलधारांनी नवीन जीवन फुलवू द्या, आमच्या बळीराजाच्या कष्ट आणि मेहनतीला फळ येऊ द्या ,आपली सृष्टी अन्नधान्याच्या कोठारांनी सम‌द्ध होऊ द्या ,हीच एक सदिच्छा आजच्या ह्या आषाढस्य द्वितीय दिनी.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.