महाराष्ट्र अंनिसच्या राज्यस्तरीय तीन पुरस्काराने चंद्रपूर जिल्हा सन्मानित

 महाराष्ट्र अंनिसच्या राज्यस्तरीय तीन पुरस्काराने चंद्रपूर जिल्हा सन्मानित 



चंद्रपूर:- दीपक देशपांडे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर येथील विस्तारित राज्यस्तरीय बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याला राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र अंनिसच्या कार्याचा प्रचार प्रसार व समितीचे वार्षिक कार्यक्रम अविरत कार्याची दखल घेऊन हे तीनही पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले. राज्यस्तरीय लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार २०२६ मा. पी.एम. जाधव राज्य सहकार्यवाहक वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प यांना मिळाला आहे.चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खनके यांचे मार्गदर्शनाखाली ऊर्जानगर शाखा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकाचे वार्षिक विशेषांक व मासिकाचे अधिकाधिक देणगीदार व वर्गणीदार केल्याबद्दल शाखेद्वारा महाराष्ट्र अंनिसचे अनेक उपक्रम राबविल्याबद्दल देवराव कोंडेकर यांना राज्यस्तरीय लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार २०२६ मिळाला आहे आणि ऊर्जानगर शाखेला राज्यस्तरीय लक्षवेधी शाखा पुरस्कार २०२६ मिळाला आहे. हे तीनही पुरस्कार महाराष्ट्र अंनिसच्या विस्तारित राज्यस्तरीय बैठकीत पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्यातील असंघटिक कामगारांचे नेते तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व एस.एम जोशी सोशलिष्ठ फाउंडेशनचे अध्यक्ष डाँ.सुभाष लोमटे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संविधान अभ्यासक प्रा.सुभाष वारे,महाराष्ट्र अंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे,राज्य कार्याध्यक्ष प्रा.संजय बनसोडे यांचे हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व साहित्यसहित पुरस्कार मा.पी.एम.जाधव राज्य सहकार्यवाहक वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प ,चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष नारायण चव्हाण,जिल्हा प्रधान सचिव दुरेंद्र गेडाम

यांनी संयुक्तिक स्विकारला.सदर पुरस्कार संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पी.एम.जाधव यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे,चमत्कार सादरीकरण तसेच जिल्ह्यातील महाविद्यालय,शाळा व शहर,गावात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे तसेच ऊर्जानगर शाखेच्या वतीने वर्षभरात परिसरातील शाळेत फटाकेमुक्त दिवाळी,एक गांव एक होळी,एक गणपती,निर्भय मॉर्निंग वाक व समितीचे वार्षिक उपक्रम उत्तमरीत्या राबविल्याबद्दल जिल्ह्याला सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.