अप्रत्यक्ष निवडणुकीत आचारसंहिता लावली जाणे गरजेचे आहे काय? परिसंवादाचे आयोजन.

 अप्रत्यक्ष निवडणुकीत आचारसंहिता लावली जाणे गरजेचे आहे काय?

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स तर्फे परिसंवादाचे आयोजन



नागपूर: दीपक देशपांडे.

भारतात भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता अथवा 'निवडणुकीची आदर्श आचारसंहिता' किंवा सामान्यपणे ज्यास निवडणुकीची आचारसंहिता असेही संबोधल्या जाते, ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून म्हणजे एखाद्या क्षेत्राची निवडणूक घोषित झाल्यापासून ते ती निवडणूक संपून निकाल बाहेर येतपर्यंत लागू असते.

 आपल्या देशात सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुका होत असतात. निवडणूका म्हटल्या की आचारसंहिता ही लागतेच. आचारसंहिता लागली की सहाजिकच विकास कामे ठप्प होतात. 

जर सामान्य मतदार निवडणुकीत मतदान करणार असेल तर आचारसंहिता असायलाच हवी. मात्र जिथे अगदी मोजके  मतदार मतदान करणार असतील, तिथे आचारसंहितेची खरोखरी गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सध्या महाराष्ट्रात १७ मतदारसंघातून विधान परिषदेसाठी सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या त्या मतदारसंघातील फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी इथे मतदान करणार आहेत, जे एकूण मतदार संख्येच्या एक टक्का सुद्धा नाहीत. बाकी सामान्य माणसाला तिथे काहीही देणे घेणे नाही. तरीही आचारसंहिता लावली जाते आणि सामान्य माणसाला हवी असलेली विकास कामे रोखून धरली जातात. त्यामुळे जनसामान्यांची नाराजी वाढत असते. 

*नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स*, ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली राष्ट्रीय विचाराशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारांची संघटना आहे. ही संघटना अशा विविध जिव्हाळ्याच्या विषयांवर विचारमंथन घडवून आणत असते. त्यामुळेच या संघटनेच्या विदर्भ प्रांत शाखेतर्फे या विषयावर विचारमंथन घडवून आणण्याचे ठरवले आहे. *गुरुवार दिनांक १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता* *"अप्रत्यक्ष निवडणुकीत आचारसंहिता लावली जाणे गरजेचे आहे का?"* या विषयावर *नवदृष्टी सभागृह, अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर*, येथे एका परिसंवादाचे आयोजन केलेले आहे. *माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख, विधीज्ञ एड. अविनाश काळे हे या परिसंवादात आपली मते मांडणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक तरुण भारतचे निवृत्त मुख्य संपादक सुधीर पाठक या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहतील*.

नागरिकांनी मोठ्या संख्येने या परिसंवादाला उपस्थित रहावे असे आवाहन नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र, च्या विदर्भ प्रांत चे अध्यक्ष अविनाश पाठक आणि सचिव पराग जोशी यांनी केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.