लक्षवेधी:- मूलची पाणी समस्या! भाजपचा घागर मोर्चा.एक आकलन आणि चिंतन.

 लक्षवेधी.

मूलची पाणी समस्या! भाजपचा घागर मोर्चा.     एक आकलन आणि चिंतन.

दीपक देशपांडे 

बुधवार दिनांक १७जून रोजी दुपारी बारा वाजता भाजपचे वतीने स्थानिक रामलीला भवन परिसरातून निघालेला घागर मोर्चा नगरपरिषद कार्यालयात दाखल झाला, या मोर्चात प्रतिकात्मक रिकाम्या घागरी ठेवून त्याची शवयात्राही काढण्यात आली आणि नगरप्रशासनाच्या कार्यप्रणाली बाबत निषेध करणारी नारेबाजी ही करण्यात आली  मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले, याप्रसंगी घागरी नगरपरिषद कार्यालयासमोर फोडण्यात ही आल्या.

हा असा प्रकार कां झाला असावा?

या प्रश्नाचे उत्तर आहे, मूल नगरपरिषद क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून (दिनांक ११ते१५जून) नगरवासियांना  पाणीपुरवठा झाला नाही , कां? तर मूल तालुक्यातील अनेक भागात वारा वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब पडले ,तारा जमीनीवर पडल्या शिवाय वीजपुरवठा खंडित झाला होता, ही बाब सगळ्यांना चांगलीच ठाऊक आहे.

बरं एकदा बंद पडलेला विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न करीत  दिनांक १५जून रोजी सायंकाळी ७ वाजता विजपुरवठा सुरु केला की नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी आलेल्या वादळाने आणि  तांत्रिक अडचणी मुळे पुन्हा एकदा विजपुरवठा खंडित झाला परिणामी चार दिवसानंतर एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यशस्वी झालेल्या नगरप्रशासनाची बाजू समजून न घेता दुसऱ्या दिवशी ह्या घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आणि नगरप्रशासनाच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले गेले हा केवळ नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर टीका करुन त्यांना वेठिला धरण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप नगरप्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

असे कां?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की , नगरप्रशासनाच्या वतीने पहिल्यांदा वारा वादळामुळे तुटलेल्या तारा आणि कोसळलेले खांब उभे करून विजपुरवठा सुरु करण्यात आला आणि रात्री उशिरा  पुन्हा एकदा तांत्रिक  बिघाडामुळे विजपुरवठा बंद होईपर्यंत भरलेल्या टाकीतील पाणीपुरवठा  मंगळवारी सकाळी नगरातील काही भागात करण्यात आला, परंतु रात्री उशिरा बंद झालेला विजपुरवठा पुन्हा एकदा सुरू होईस्तोवर  नगरपरिषद प्रशासनाला पाणी पुरवठा करणे अशक्य होते ,ही संधी साधून भाजपचे वतीने या घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले, यादरम्यान पुन्हा एकदा विजपुरवठा सुरु होताच नगरात बुधवारी पाणी पुरवठा करण्यात आला, यावेळी आदल्या दिवशी मंगळवारी ज्या भागात पाणी पुरवठा केला गेला होता त्या भागात सकाळी पाणीपुरवठा न करता ज्या भागात आदल्या दिवशी पाणीपुरवठा केला नव्हता त्या भागात पाणी पुरवठा केला गेला होता आणि याबाबत तशी सुचनाही समाज माध्यमातून मूलच्या जनतेला देण्यात आली होती , याशिवाय उर्वरित भागात सायंकाळी पाणीपुरवठा केला जाईल असेही त्यात नमूद केले होते याशिवाय आज गुरुवार पासून नियमित वेळी पाणीपुरवठा केला जाईल हेदेखील नमूद करण्यात आले होते.

अशा परिस्थितीत भाजपचे वतीने काढण्यात आलेला हा घागर मोर्चा म्हणजे केवळ राजकीय दबाव वाढविण्यासाठी आणि जनमानसाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी केलेला प्रयत्न होता अशी बोलकी प्रतिक्रिया जनमानसातून उमटली आहे , आम्ही यांचेही कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता जनतेच्या समोर आलेली वास्तविकता आहे.

ही वास्तविकता काय?

याचाही पाठपुरावा करताना आमच्या हातात नगरपरिषद प्रशासनाचे वतीने प्रसिद्धीला दिलेली एक प्रेस नोट हाती लागली,ती प्रेस नोट अशी.


जी याबाबत बरंच काही स्पष्ट करुन  जाते खरंय ना ?आता ....?

हा विषय इथे थांबायला हवा होता पण.... पुन्हा एकदा ...

हा विषय चर्चेला आलाच आहे, त्यामुळे, आम्हालाही याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाटली.... म्हणून.......

उर्वरित भाग ....पुढिल अंकात....


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.