देवनील विद्यालय टेकाडी चा उत्कृष्ट निकाल

 देवनील विद्यालय टेकाडी चा उत्कृष्ट निकाल  

मूल, दीपक देशपांडे 

             विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित देवनील विद्यालय टेकाडी येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल ९३% असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असून यावर्षी विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे साहिल अतुल मांदळे हा ८१.२० टक्के घेऊन विद्यालयातून प्रथम तर आनंद भोयर हा ८०.२० टक्के गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय ,तृतीय क्रमांक प्राप्त समृद्धी नागोसे हिने ७९.२० टक्के गुण प्राप्त केले. 

परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत  असून २३ प्रथम श्रेणी ,२५ द्वितीय श्रेणी तर १० उत्तीर्ण श्रेणीत विद्यार्थ्यांनी यश संपादित केले .सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी आमदार देवरावजी भांडेकर ,उपाध्यक्षा डॉ. स्मिता भांडेकर, सचिव डॉ. महेश भांडेकर मुख्याध्यापक राजेश सावरकर, सरपंच  कालिदास खोब्रागडे ,सरपंच सतीश चौधरी उपसरपंच योगेश लेनगुरे ,माजी सरपंच डॉ. गजानन चौधरी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.