दिनविशेष:- आज जागतिक मातृदिन
दिनविशेष
आज जागतिक मातृदिन
*"नास्ति मातृसमा छाया,*
*नास्ति मातृसमा गतिः ।*
*नास्ति मातृसमं त्राणं,*
*नास्ति मातृसमा प्रपा ॥"*
*आईसारखी दुसरी सावली नाही, आईसारखा दुसरा निवारा नाही, आईसारखे दुसरे संरक्षण नाही आणि आईसारखे दुसरे पाण्याचे ठिकाण (अमृत) नाही.*
*या जगात सदैव जे जे काही मंगल.. कल्याणकारी शुभ घडते मातृत्व भावनेमुळेच. लोक सुखात.. शांततेत जगू शकतात ते या मातृत्व भावनेमुळे. हिंसेला आवर घालू शकण्याचे सामर्थ्य मातृत्व भावात आहे.*
*मातेच्या प्रेमाची.. उपकाराची गणनाच होवू शकत नाही. यामुळेच आम्ही देशालाही मातृभूमि म्हणतो.*
*जननी जन्मभूमिश्च*
*स्वर्गादपि गरीयसी ।*
*माता आणि मातृभूमि यांचे हे अपरंपार महत्त्व. मातेच्या आशीर्वादाशिवाय जीवन व्यर्थ आहे. प्रत्यक्ष श्रीराम असो वा श्रीकृष्ण यांनाही मातेच्या उदराचा आसरा घ्यावा लागला. या मातृत्व भावनेतील दडलेल्या प्रेमामुळेच गुरुंनाही "माऊली" संबोधले जाते.*
*आज मातृदिन. प्रथम वंदन करुया वाघाचे दात मोजणाऱ्या भरताला जन्म देणाऱ्या शकुंतला मातेला. या भरतामुळे देशाचे नाव भारत आहे.*
*आई म्हणजे जगात परमेश्वरी अस्तित्वाचा चालता बोलता पुरावा. आई म्हणजे प्रेमाचे आगळे रसायन. आई म्हणजे सहनशीलतेचा कळस. असह्य कळा सोसत श्वास रोखून बाळात श्वास येताच त्या वेदना क्षणात विसरत आनंदाश्रूंचा अभिषेक घालते ती माताच. सृजनाचा तर जन्मसिद्ध हक्कच प्राप्त आहे. मातेच्या अपूर्व त्यागानेच ही सृष्टी सजीव आहे.*
*पृथ्वीच्याही उदारतेला लाजवेल असे विशाल.. उदार.. त्यागी अंतःकरण लाभलेय ते आईलाच. संकट असो वा कोणत्याही भावनांना वाट करुन देतांना पहिली आठवण होते आईची. जगाने पाठ फिरवली तरीही मातेचे व्दार लेकरांना सदैव उघडे असते. पराकोटीची क्षमाशीलता.. निस्वार्थवृत्ती आणि लेकरांच्या आनंदात आनंद शोधणारी असते ती आईच.*
*या जगात विकत घेता येत नाही अशी एकमेव गोष्ट म्हणजे आईचे निर्व्याज्य प्रेम. जन्मोजन्मी आईचे ऋण फेडणे अशक्यच. या भारतात तर आईच्या कर्तुत्वाला तोडच नाही. विरमाता जिजाबाई.. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, बाया कर्वे.. सिंधुताई सपकाळ.. अश्या किती किती म्हणून मातांची थोरवी वर्णावी..*
*आई हेच जगताचे दैवत. जिच्या संस्कारानेच ही संस्कृती टिकून आहे. जिचे ऋण जन्मोजन्मी फेडणे अशक्य आहे.. अशा परमेश्वरी रुपात वावरणाऱ्या समस्त मातांना साष्टांग दंडवत..*
*आई सारखे दैवत*
*सार्या जगतावर नाही*
*म्हणून श्रीकाराच्या नंतर*
*शिकणे अ, आ, ई*
*मुलांनो शिकणे अ, आ, ई*
*तीच वाढवी ती सांभाळी*
*ती करी सेवा तीन त्रिकाळी*
*देवानंतर नमवी मस्तक*
*आईच्या पायी*
*कौसल्येविण राम न झाला*
*देवकीपोटी कृष्ण जन्मला*
*शिवरायाचे चरित्र घडवी*
*माय जिजाबाई*
नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा
होई उतराई.
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment