नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूलचा बारावी परीक्षेत डंका; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूलचा बारावी परीक्षेत डंका; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मूल: दीपक देशपांडे.
स्थानिक नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूल येथील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आले.
यशाचे मानकरी
या परीक्षेत महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे:
प्रथम: ओम सुनील राखडे (91.67%)
द्वितीय: समृद्धी सिलवंत रामटेके (86.67%)
तृतीय: उत्कर्ष सतिश काळे (85.83%)
मान्यवरांच्या हस्ते गौरव
मार्गदर्शक मा. श्री. संतोषभाऊ रावत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रामुख्याने लिनाताई फुलझेले (शिक्षण सभापती), नलीनीताई आडपवार (सभापती), समिक्षाताई कडस्कर (उपसभापती) यांच्यासह नगरसेवक विवेक बळवंतराव मुत्यलवार, अतुल गोवर्धन, नितीन गदेवार, डेव्हिड खोब्रागडे, राहुल प्रेमलवार, रितीक गोयल, सुशीलाताई खोब्रागडे आणि काजल धारणे यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
"विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्दीचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे फळ आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे उत्तुंग भरारी घ्यावी," असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या यशामुळे विद्यार्थ्यांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment