पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांना पदोन्नती! हा तर त्यांच्या कार्याचा खरा गौरवच! दीपक देशपांडे.

पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांना पदोन्नती!

हा तर त्यांच्या कार्याचा खरा गौरवच! दीपक देशपांडे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांना एपीआय(सहायक पोलिस निरीक्षक)पदावर पदोन्नती  

डीडिबातमी वृत्तसेवा.

   शासनाच्या पदोन्नती धोरणानुसार पोलीस विभागातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदांच्या रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशी व पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांच्या मान्यतेनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासनाच्या ७ मे २०२१ च्या निर्णयानुसार सेवाज्येष्ठतेच्या निकषावर पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार सन २०२४-२५ साठी विभागीय पदोन्नती समितीने पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची तयार केली होती. या प्रक्रियेत यापूर्वी ३४१ पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर निवडसूचीतील मोहोरबंद प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्यात आले. पुनर्विलोकनानंतर आणखी ४८८ पात्र पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी मंजुरी देण्यात आली असून, महसूल संवर्ग वाटप नियमांनुसार त्यांची पदस्थापना निश्चित करण्यात आली आहे. या पदोन्नती यादीत चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभिषेक प्रभाकर जंगमवार, वर्षा तुकाराम नैताम, दीपक भाऊराव ठाकरे, सचिन विनायक मुसळे आणि मनोज विलासराव वासाडे या पाच पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहायक पोलीस निरीक्षक पदाचे अधिकार व जबाबदाऱ्या लागू होणार आहेत. या पदोन्नतीमुळे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मनोबलात वाढ होणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मूल पोलिस दलात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी आपल्या कार्यकाळात मूल पोलिस ठाण्यात दाखल अशा काही प्रकरणांमध्ये दाखवलेली चुणूक आणि कार्यतत्परता यामुळे बऱ्याच मोठ्या प्रकरणात यशस्वीपणे कारवाई करुन गुलदस्त्यात असणारी अनेक प्रकरणे उघड करण्यात यश मिळाल्याचे मूलच्या जनतेने बघितले असल्याने  आणि आम्ही ग्राहक जागृती  कार्यक्रम निमित्ताने  अनेक कार्यक्रमांतून  एका मंचावरून एकत्रीत मार्गदर्शन करताना  आलेल्या अनुभवावरून एका कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याचा खरा सन्मान करण्यात आल्याची आणि  यामुळे त्यांना  आपली तपासाची दिशा अधिक सक्षम करीत गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि वचक निर्माण करण्यासाठी  अधिक बळ प्राप्त झाले असल्याची प्रतिक्रिया  जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी व्यक्त केली आहे , आणि त्यांचे अभिनंदन करीत पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.