सिकची रिसॉर्टमध्ये शिबीर अपर मुख्य सचिव येणार

 सिकची रिसॉर्टमध्ये शिबीर 

अपर मुख्य सचिव येणार 


दीपक देशपांडे.

महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेच्या जगतात विनामूल्य सेवा देणाऱ्या व फक्त प्रतिदिन एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस अंतर्गत १६ मे ते २२ मे या कालावधीत अमरावतीच्या वलगाव येथील  सिकची  रिसॉर्ट आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव व सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री विकास खारगे  हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे कार्याध्यक्ष श्री महेबूब कासार उपाध्यक्ष  प्राचार्य डॉ. रामदास चवरे व सदस्य श्री रविंद्र कटके यांनी मुंबईला मंत्रालयात जाऊन श्री विकास खारगे यांची भेट घेतली व त्यांना स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला येण्याची विनंती केली. त्यांनी ती विनंती मान्य केली असून २२ मे रोजी सकाळी १० वाजता ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी  सिकची रिसॉर्ट वलगाव अमरावती येथे येणार आहेत. विशेष म्हणजे २६ वर्षांपूर्वी म्हणजे १२ मे २००० या तारखेला श्री विकास खारगे यवतमाळला जिल्हाधिकारी असताना त्यांनी अमरावतीला दंत महाविद्यालयात मिशन आयएएस या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. गेल्या २६ वर्षात ते मिशन आयएएसच्या संपर्कात असून त्यांनी आपल्या अमरावती भेटीत प्रत्येक वेळेस मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली आहे. 

याही भेटीत त्यांनी मिशन आयएएसच्या कार्याचा गौरव केला असून मिशनने केलेले कार्य हे अभूतपूर्व आहे यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि मिळत राहणार आहे असेही ते यावेळी म्हणाले. 


महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराच्या निमित्ताने अमरावती येथील भव्य अशा सिकची रिसॉर्ट मध्ये येणार असल्याने स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. श्री विकास खारगे यांचे २२ तारखेला सकाळी १० वाजता होणाऱ्या या मार्गदर्शन कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे या शिबिराचे आयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे प्रा. पल्लवी काठोळे व ,सिकची रिसॉर्टचे संचालक श्री सचिन माळकर यांनी एका पत्रकान्वये केली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेला आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.