दक्षिणेत विजयाचा भाजपाचा विजयोत्सव साजरा

 मूल नगरीत भाजपाचा विजयोत्सव साजरा 



दीपक देशपांडे 

सोमवारी लागलेल्या चार राज्य व एक केन्द्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात  पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडेचेरी मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट जनादेश मिळाला, सोबतच तामिळनाडू आणि केंरळ मध्ये पक्षाचं वोटिंग परसेन्ट चांगल्या टक्क्यांनी वाढलं , स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगाल या राज्यात प्रथमच भाजप ची सत्ता आली, यासाठी भारतीय जनता पक्ष मूल शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मूल शहरात जल्लोष साजरा केला, सर्वप्रथम कन्यका माता मंदिर ते गांधी चौक पर्यंत ढोल ताशांच्या  गजरात भव्य रॅली काढण्यात आली, नंतर गांधी चौकात एकत्रित येत पेढे वाटून, नारे देत, फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला, 

प्रसंगी भाजप  मूल शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी भाजपा नेते ,भाजप नेत्या प्रा सौ किरण कापगते, यांचे सह अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

विविध नाऱ्यानी गांधी चौक परिसर दणाणून गेला होता.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.