मूल तालुक्यातील बारावीच्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतली आघाडी.

 मूल तालुक्यातील बारावीच्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतली आघाडी.

दीपक देशपांडे.

नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूलचा इयत्ता १२ वी निकाल ९८%

ओम सुनील  राखडे– 91.67% प्रथम.

यावर्षी १८ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त तर २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

महाविद्यालयात प्रथम पाच क्रमांक मिळवणारे विद्यार्थी–

१)ओम सुनील राखडे  91.67%

२)समृद्धी शिलवंत रामटेके 86.67%

३) उत्कर्ष  सतिश काळे-85.83%

४)हुरैन मोहिले शेख-- 84.00%

५)संकेत कोंडदेव कोले--83.67%

तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 

मान. अध्यक्ष ॲड . अनिलराव वैरागडे, उपाध्यक्ष. ॲड प्रणव वैरागडे ,सचिव श्री . शशिकांत धर्माधिकारी शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच प्राचार्य  छत्रपती बारसागडे,  प्राध्यापक वृंद आणि शिक्षक वर्ग व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

कर्मवीर महाविद्यालय मूल येथील उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम वाणिज्य शाखा १००%

मयूर संजय दयालवार यांनी ७३.१७% तर कु. प्रणिता शंकर राऊत यांनी ७८.५० %

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय मूल येथील जाहीर झालेल्या मार्च २०२६ च्या परीक्षेत इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९०.८७ % निकाल देऊन दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. कला शाखेत २१७ पैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८८.०१ % निकाल लागला आहे. तर वाणिज्य शाखेत ६८ विद्यार्थी पैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

कला शाखेतून सर्वाधिक गुण प्राप्त करून मयूर संजय दयालवार यांनी ७३.०१% गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. तर वाणिज्य ( कॉमर्स) शाखेत सर्वाधिक गुण प्राप्त करून कु. प्रणिता शंकर राऊत यांनी ७८.५० % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आली आहे. एकंदरीत कर्मवीर महाविद्यालयाने आपल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. दोन्ही शाखेतून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष एड. अनिलजी वैरागडे, सचिव शशिकांतजी धर्माधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. अनिता वाळके तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक दिनेश बनकर यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मूल – १००% निकालाची परंपरा कायम.

महाराष्ट्र राज्य बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मूल या महाविद्यालयाने यंदा १०० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

🔹 प्रथम क्रमांक: कु. मयुरी चरनदास सतरे – 69.50%

🔹 द्वितीय क्रमांक: कु. आर्यन प्रफुल मेश्राम – 68.17%

🔹 तृतीय क्रमांक: कु. जानवी शालिक वासेकर – 67.83%

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊराव झाडे सर, मुख्याध्यापिका रीमा कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद सर, तसेच ज्युनियर कॉलेज प्रभारी, वर्गशिक्षक दुष्यंत गणवीर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढील शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून या कनिष्ठ महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स ही नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतली आघाडी.

मूल ग्रामीण मधिल  चिखली या छोट्या गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथील दोन मैत्रिणी कला शाखेत मूल तालुक्यांतून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून उत्तिर्ण झाल्या आहेत.त्यापैकी १)कु.रागिणी बंडू धंद्रे(८३.५०%)  ही मोरवाही सारख्या अतिशय छोट्या गावातील रहिवासी असून २)तृतीय क्रमांक पटकावणारी कु.जान्हवी जोलमवार ही चिखली येथील रहिवासी आहे. आणि या दोन्ही  विद्यार्थिनींच्या  यशामुळे परिसरात ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी  महाविद्यालयाचे प्राचार्य दुर्वास  कडस्कर यांनी  व परिसरातील  मान्यवरांनी  अभिनंदन केले असून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे आणि मूल तालुका पदाधिकारी यांनी मूल तालुक्यातील समस्त यशस्वी विद्यार्थ्यांना, विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रम व चिकाटीचे कौतुक करीत सगळ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे व अपयशी विद्यार्थ्यांना अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याने खचून न जाता यश मिळवण्यासाठी जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करीत सांत्वनही केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.