महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल
दीपक देशपांडे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेची (HSC Exam Result 2026) प्रतीक्षा अखेर संपली आहे. या परीक्षेचा निकाल आज शनिवार, 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्य मंडळामार्फत पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येत आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली आहे.
त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. यावर्षीही निकालात घट झाली आहे. यावर बोलताना कुलकर्णी म्हणाले की, “निकाल घटण्यामागे मुख्य कारण म्हणजे कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले. गेल्या वर्षी एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नव्हती, मात्र यावर्षी 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.”
त्रिगुण कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, फेब्रुवारी-मार्च महिन्यात 153 विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 14 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 89.79 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.15 टक्के इतकी राहिली, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 86.80 टक्के इतकी आहे. परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. परीक्षा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आली. याप्रकरणी एकूण 15 एफआयआर दाखल करण्यात आले असून 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
यंदाही बारावीच्या निकालाची टक्केवारी घटली असली, तरी मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळांमधून 93.15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 86.80 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे.
Maharashtra HSC 12th Result 2026: बारावी निकालाचा टक्का का घसरला?
कॉपीमुक्त अभियान काटेकोरपणे राबविण्यात आले
सीसीटीव्हीमुळे कॉपी रोखण्यात यश
बोर्डाचे अधिकारी आणि शिक्षकांचे काटेकोर नियोजन
परीक्षा पूर्व व परीक्षा काळातील प्रभावी संवाद
Maharashtra HSC 12th Result 2026: वर्षानुवर्षे घटतोय बारावीचा निकाल
2022 – 94.22%
2023 – 93.73%
2024 – 93.37%
2025 – 91.88%
2026 – 89.79%
Maharashtra HSC 12th Result 2026: मुलींनी पुन्हा मारली बाजी
मुली उत्तीर्ण – 93.15%
मुले उत्तीर्ण – 86.80%
Maharashtra HSC 12th Result 2026: सलग दुसऱ्या वर्षी निकालात घट
फेब्रुवारी-मार्च 2024 निकाल – 93.37%
फेब्रुवारी-मार्च 2025 निकाल – 91.88%
फेब्रुवारी-मार्च 2026 निकाल – 89.79%
Maharashtra HSC 12th Result 2026: या वेबसाइटवर पाहता येणार निकाल
https://hscresult.mkcl.org/
https://hscresult.mahahsscboard.in/
https://mahresult.nic.in/
निकालासाठी काय लागेल?
विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)
आईचे पहिले नाव (Mother’s First Name)
निकाल कसा पाहायचा?
mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटपैकी कोणत्याही एका वेबसाइटला भेट द्या.
‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचा सीट नंबर टाका.
आईचे पहिले नाव टाका.
‘View Result’ वर क्लिक करा.
निकाल स्क्रीनवर दिसेल. त्याचा प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवा.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment