कृषी महाविद्यालयाच्या पडिक जमिनीवर वृक्षारोपण!
कृषी महाविद्यालयाच्या पडिक जमिनीवर वृक्षारोपण!
स्वच्छता ही सेवा चा ५००वा टप्पा.
दीपक देशपांडेकृषी महाविद्यालय मूल व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार नागपूर च्या वतीने गुरुवार दिनांक २३एप्रिल ला स्वच्छता ही सेवा अभियानाचा ५०० वा टप्पा पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मान.चंद्रशेखर गलगलीकर,आर्ट ऑफ लिव्हिंग वरिष्ठ प्रशिक्षक व समाज सेवक, नागपूर, डॉ.जयश्री गलगलीकर , समाज सेविका, नागपूर, दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत, चंद्रकांत मनियार, वरिष्ठ पत्रकार,मूल, विनोद इंगोले, वरिष्ठ विदर्भ प्रतिनिधी ॲग्रोवन,आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक, डॉ विलास अतकरे, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय मूल यांनी दिली आहे.
हा कार्यक्रम दुपारी साडेचार वाजता कृषी महाविद्यालयाच्या सोमनाथ येथील जागेवर संपन्न होणार आहे,या आयोजनात ७० फणसाची झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.याकरिता वहिवाटी खाली नसलेली ०.५ एकर पडीत असलेली जमीन वृक्ष लागवडीकरीता पहिल्यांदाच तयार करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील वातावरण फणस लागवडीकरीता पोषक असून झाडांची उपलब्धता गडचिरोली येथील शासकीय रोपवाटिकेतून करण्यात येणार आहे रोपे आर्ट ऑफ लिव्हिग परिवार नागपूर मार्फत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment