हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक२०२५ अभियानांतर्गत मूल बसस्थानकाचे अंतिम मुल्यांकन पार पडले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक २०२५ अभियानांतर्गत मूल बसस्थानकाचे अंतिम मुल्यांकन पार पडले.
मूल दीपक देशपांडे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक २०२५ अभियान राबविण्यात आले होते.
या अभियानात आज ०४ एप्रिल२०२६ रोजी ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे सर्वेक्षण करून अंतिम मूल्यांकन करण्यात आले. प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील पुणे प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, पुणेचे प्रादेशिक अभियंता रमेश कांबळे, जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष व प्रवासी संघाचे अध्यक्ष,दीपक देशपांडे, तसेच दै. लोकमत समाचार चे मूलचे प्रतिनिधी पत्रकार चंद्रकांत मनियार यांच्या चार सदस्यीय समितीने मूलच्या बसस्थानकाची पाहणी केली.
या अभियानात 'अ' वर्गातील बसस्थानकाचे आजपर्यंत चार वेळा मूल्यांकन झाले आहे. १६मे, ३०जूलै व १९नोव्हेंबर २०२५रोजी मुल्यांकन पूर्ण करण्यात आले होते आणि आज या प्रादेशिक समितीतर्फे मूल बसस्थानकाचे अंतिम मूल्यांकन करण्यात आले. या समितीच्या मुख्य परिक्षण अधिकारी अमृता ताम्हणकर या यावेळी दुसऱ्यांदा या परिक्षणासाठी उपस्थित होत्या त्या यापूर्वी पहिल्या परिक्षणादरम्यान उपस्थित होत्या आणि मूल बसस्थानक परिसरात झालेला बदल बघून आनंद व्यक्त करीत होत्या,त्यांचे सोबत पहिल्या परिक्षणासाठी पुणेचे प्रादेशिक अभियंता कार्तिक सहारे उपस्थित होते.
तर दुसऱ्या परिक्षणासाठी ३०जूलै रोजी ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे सर्वेक्षण करून दूसरे मूल्यांकन करण्यात आले. प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील छ. संभाजी नगरच्या प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक २च्या अनघा बारटक्के , आणि अशोक पन्हाळकर छ. संभाजी नगरचे प्रादेशिक अभियंता क्रमांक २, हे उपस्थित होते.
१९ नोव्हेंबर रोजी ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे सर्वेक्षण करून तिसरे मूल्यांकन करण्यात आले. प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील अमरावती येथील प्रादेशिक व्यवस्थापक रोहन भानुदास पलंगे , व अमरावती येथील राकेश सुरेश पवार वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी उपस्थित होते.
यांचे सोबत या चारही मुल्यांकन प्रसंगी स्थानिक मुल्यमापन समिती सदस्य म्हणून जागृत ग्राहक राजा संघटनेच्या वतीने दीपक देशपांडे ,अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत व प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक पत्रकार चंद्रकांत मनियार हे समिती सदस्य म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकाला एक करोड रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे ,तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत दिवसेंदिवस या वर्षात अधिकाधिक चुरस निर्माण झाली आहे.
मूल बसस्थानकाचे मूल्यांकन करताना समितीतर्फे बसस्थानक, परिसरासह पुरुष व महिलांच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, दिशादर्शक सुचनाफलक , बसस्थानकाची रंगरंगोटी, बसस्थानकाचे नाव व फलाटावरील फेरीनिहाय गावाचे फलकांचे निरीक्षण केले. बसस्थानकावरील चौकशी खिडकीच्या बाजूला वेळापत्रक, उद्घोषणा यंत्रणा, प्रवाशांच्या तक्रारी, सूचना संबंधित बसस्थानकासह आगार व आगार व्यवस्थापकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, चालक व वाहकांचे विश्रांतीगृह, बसस्थानकावरील चौकशी, आरक्षण सोयीसुविधा, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी मासिक पास खिडकीची सुविधा, नागरिकांना एनसीएमसी. नवीन सवलत कार्ड सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ,रेलिंग, वाणिज्य आस्थापना आणि पार्किंग व्यवस्थेबद्दल सर्वेक्षण करण्यात आले.
जून्या काही उणीवा भरुन काढत आपले बसस्थानक अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असावे यासाठी स्थानिक पातळीवर महामंडळाचे कर्मचारी,व जनतेच्या सहकार्यावर या स्पर्धेत मूलचे बसस्थानक टिकेल की नाही हे ठरणार होते , त्यामुळे प्रत्येकाने आपला सहभाग दर्शविणे आवश्यक होते ,व आपले बसस्थानक स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते,मात्र या स्पर्धेत टिकण्यासाठी बाग बगीचा व हरीत क्रांतीसाठीही प्रयत्न करणं गरजेचे असताना सगळीकडे सिमेंट चे जंगल उभे केल्याने बाग बगीचा कसा व कुठे करावा यासाठी महामंडळ अधिकारी व कर्मचारी योग्य तो निर्णय घेण्यात आणि बाग बगीचा उभारण्यात अयशस्वी ठरले ही बाब वगळता मूल बसस्थानक परिसरात बऱ्यापैकी सुधारणा करण्यात आल्याचे सर्वेक्षण समितीला या परिक्षणादरम्यान आढळून आले असून समितीने आपला अहवाल सादर केला आहे, परिणामी आता लवकरच या परिक्षणाचा निकालही जाहीर होण्याची शक्यता वाढिस लागली आहे. आणि या सर्वेक्षणात कोण वरचढ ठरणार आणि कोण विजेते ठरणार हे जाहीर होणार आहे. उत्सुकता वाढवणारा हा क्षण काही दिवसांत शिक्कामोर्तब करुन महाराष्ट्रातील विजेते बसस्थानक लवकरच जाहीर करण्यात येईल असे या समितीनं स्पष्ट केले आहे.
याप्रसंगी कविता वसू वाहतूक निरीक्षक चंद्रपूर ,हेमराज सातपुते वाहतूक नियंत्रक, आणि विभा बोथले या प्रामुख्याने उपस्थित होत्या. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रवासी महिला व नागरिक उपस्थित होते,या समितीच्या वतीने बसस्थानक परिसरातील वेगवेगळ्या भागाची, प्रसाधनगृह व आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करून असलेल्या उणिवा , रंगरंगोटी , सोयीसुविधांचा परामर्श घेत अडिअडचणी जाणुन घेत अनेक चांगल्या गोष्टी बसस्थानक परिसरातील चित्रे व आकर्षक पेंटिंग मुळे बसस्थानक परिसरात एक आगळावेगळा आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया आणि चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्किंग करण्याची पद्धत , बाग बगीचा उभारण्यासाठी वेगळ्याच मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता यांची दखल घेतली, व आवश्यक सुधारणा करण्याच्या प्रामुख्याने सुचना दिल्या गेल्या आहेत.
औपचारिक चर्चा करताना समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या मूल नागपूर व गडचिरोली औरंगाबाद या बस फेऱ्या पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत नागपूर ला जाणाऱ्या प्रवाशांना आणि चंद्रपूर वरुन मूलला व गडचिरोली येथे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होईल यादृष्टीने महामंडळ अधिकारी यांनी दखल घेऊन तातडीने जनतेच्या मागणीची पूर्तता करण्याच्या सूचना याप्रसंगी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment