प्रशासनाने गाजर दाखविले, अन् उपोषणाची नोटिस देणाऱ्यांनी उपोषण स्थगित केले.

 प्रशासनाने गाजर दाखविले, अन् उपोषणाची नोटिस देणाऱ्यांनी उपोषण स्थगित केले.

मूल, दीपक देशपांडे.

रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची६५ सदस्यांनी केलेली मागणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे  त्यांनी संस्था चालकांकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती परंतु ती संस्थेने पूर्ण केली नव्हती , त्यामुळे संस्थेच्या १० सदस्यांनी २०एप्रिल२०२६पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. 

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी ६५ सदस्यांनी २३फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करुन चौकशीची मागणी केली होती,त्यावर सहाय्यक निबंधक यांनी ४मार्च रोजी चौकशी समिती नियुक्त केली होती मात्र अहवालासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नव्हती, आणि अजूनही चौकशी समितीने आपले कामकाज सुरू केले नव्हते ,या प्रकरणात जूने आर्थिक वर्ष संपून नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन गेले आहे , परिणामी चौकशी समिती विद्यमान संचालक मंडळाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना?असा प्रश्न उपस्थित झाला होता , म्हणून या संस्थेकडे सदस्यांनी मागणी केलेल्या २०१७ते२०२५पर्यंतच्या ऑडिट रिपोर्ट ची प्रत  व इतर माहिती सुद्धा संस्थेने पुरविलेली नाही ,सबब  संस्थेच्या १० सदस्यांनी हा उपोषणाचा इशारा दिला होता.

या बाबिला एक आठवडा उलटून गेला तरी प्रशासकीय यंत्रणेला जाग आली नव्हती मात्र १६एप्रिल रोजी तक्रारदार  व संस्थाचालक यांची एक बैठक घेऊन यांचा अहवाल उपोषणाला बसण्याचा दिवस उलटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक २१ एप्रिल रोजी देण्याचे मान्य केले ,आणि आश्वासनाचे एक गाजर उपोषण करणाऱ्यांना दाखविले.

यावरुन  या गाजराला  भुलून उपोषणाची नोटिस देणाऱ्या संस्थेच्या दहा सदस्यांनी आपल्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे ,मात्र याचा अर्थ त्यांनी आपला उद्देश बाजूला टाकला असा कुणीही काढू नये असे त्यांनी आमच्याशी हितगुज करताना स्पष्ट केले.

आता २१एप्रिल रोजी सहायक निबंधक कार्यालयाकडून कोणता अहवाल प्राप्त होतो आणि त्यावर संस्थेचे सदस्य कशाप्रकारे समाधानी होतात आणि यावर प्रशासन कोणता निर्णय घेईल, संस्था चालक कोणती मागणी मान्य करतील आणि तक्रार कर्ते सदस्य ही मागणी कशाप्रकारे मान्य करतील ना ना करतील यावर ही मागणी नेमकं कोणते वळण घेईल याकडे संस्थेचे  सदस्य आणि परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.