अखेर त्यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला. प्रशासनाला आतातरी जाग येणार काय?
अखेर त्यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला.
प्रशासनाला आतातरी जाग येणार काय?
मूल, दीपक देशपांडे.
रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची६५ सदस्यांनी केलेली मागणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संस्थेच्या १० सदस्यांनी २०एप्रिल२०२६पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी त्यांनी संस्था चालकांकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती परंतु ती संस्थेने पूर्ण केली नव्हती.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी ६५ सदस्यांनी २३फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करुन चौकशीची मागणी केली होती,त्यावर सहाय्यक निबंधक यांनी ४मार्च रोजी चौकशी समिती नियुक्त केली होती मात्र अहवालासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नाही, आणि अजूनही चौकशी समितीने आपले कामकाज सुरू केले नाही ,या प्रकरणात जूने आर्थिक वर्ष संपून नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन गेले आहे , परिणामी चौकशी समिती विद्यमान संचालक मंडळाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना?असा प्रश्न उपस्थित झाला होता , म्हणून या संस्थेकडे सदस्यांनी मागणी केलेल्या २०१७ते२०२५पर्यंतच्या ऑडिट रिपोर्ट ची प्रत व इतर माहिती सुद्धा संस्थेने पुरविलेली नाही ,सबब १० सदस्यांनी हा उपोषणाचा इशारा दिला आहे.
आता यावर प्रशासन कोणता निर्णय घेईल आणि ही मागणी कोणते वळण घेईल याकडे संस्थेचे सदस्य आणि परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment