मूल येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तीत शनिवारी होणार विशाल हिंदू संमेलन

 मूल येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तीत शनिवारी होणार विशाल हिंदू संमेलन



दीपक देशपांडे.

 मूल शहरातील शिवाजी वस्तीचे विशाल हिंदू संमेलन शनिवार दिनांक ,७मार्च २०२६ ला गुजरी चौकाच्या पटांगणात होणार आहे, सदर हिंदू संमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून आयोजकांनी जय्यत तयारी चालवली आहे, दुपारी ३ वाजता महिलांची कलशयात्रा व विविध वेशभूषेत  यात्रेचे आयोजन केले आहे, सायंकाळी ४.३० वाजता गोमाता पूजन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे, सायंकाळी ५ वाजता संत व वक्ता उदबोधन राहणार आहे, या संमेलनात श्री मुरलीधर धाम, कार्तिकस्वामी हनुमान मंदिर चे परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज हे उपस्थित राहणार आहेत, सोबतच श्री कृष्णाजी ठाकरे प्रांत कार्यकारणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ यांचे उदबोधन लाभणार आहे, नंतर महाआरती होईल व महाप्रसाद वाटून संमेलनाची सांगता होणार आहे, परिसरातील सर्व बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज आयोजन समिती, शिवाजी महाराज वस्ती मूल यांनी केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.