“एमपीएससी (कृषी) परीक्षेकरिता दिशादर्शक मार्गदर्शन: कृषि महाविद्यालय, मूल येथे व्याख्यानाचे आयोजन”
“एमपीएससी (कृषी) परीक्षेकरिता दिशादर्शक मार्गदर्शन: कृषि महाविद्यालय, मूल येथे व्याख्यानाचे आयोजन”
मूल, दीपक देशपांडे
कृषि महाविद्यालय, मूल येथे दिनांक २८ मार्च, २०२६ रोजी आयोजित “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी विभागासाठी परीक्षेची तयारी” या विषयावर प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच अंतर्गत व्याख्यानाच्या शृंखलेत हे आठवे अतिथी व्याख्यान होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून मा. श्री. पवन सुरेश मडावी, मंडळ कृषि अधिकारी, धानोरा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे तसेच डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात श्री. नागेश नवघरे सहाय्यक प्राध्यापक (मृद विज्ञान) यांच्या प्रास्ताविकपर भाषणाने झाली.
कार्यक्रमास उपस्थित श्री. पवन मडावी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची संपूर्ण रचना, अभ्यासक्रमाचे बारकावे आणि गुण मिळविण्याच्या प्रभावी पद्धती यांचे सविस्तर विश्लेषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रिलिम्स व मेन्स परीक्षांसाठी वेगवेगळ्या अभ्यास पद्धती अवलंबण्याचा सल्ला दिला. तसेच, दररोजच्या अभ्यासाचे नियोजन, चालू घडामोडींचा अभ्यास, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि उत्तरलेखन सराव यावर विशेष भर दिला. तसेच, त्यांनी मुलाखत (इंटरव्ह्यू) टप्प्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य आणि चालू घडामोडींवरील ठोस मत मांडण्याची तयारी ठेवण्यावर भर दिला. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून वेळेचे व्यवस्थापन, सातत्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अभ्यासात संकल्पनात्मक स्पष्टता, आकृत्या व उदाहरणांचा वापर आणि तांत्रिक शब्दसंग्रहावर प्रभुत्व मिळविण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना जास्तीत जास्त सराव करण्याचे आवाहन केले कि जेणेकरून त्याचे प्रभावी आकलन होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे हे होते. त्यांनी मूलभूत विषयांवर भक्कम पकड ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि कृषी विषयातील संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाबरोबरच नोट्स तयार करणे, स्वअभ्यासाची सवय लावणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले. तसेच अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गितांशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे यांनी मानले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता वाढली असून त्यांना योग्य दिशेने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment