आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी झटावे:-कुलगुरु डॉ .एस.आर.गडाख..

आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी झटावे:-कुलगुरु डॉ .एस.आर.गडाख..

मूल, दीपक देशपांडे.

सामान्यपणे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कार्य करण्याची क्षमता आणि  कुवत असतेच , त्या क्षमतेला अधिक ताकद देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या  कुवतीनुसार जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन  पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांनी केले.. ते मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने मूल  येथील कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात आयोजित FRAGRANCE 2026 वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 

सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी  मालार्पण केले व दीप प्रज्वलन  केले , स्वागत गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यापूर्वी मान्यवरांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या आता काढलेली चित्रे यांचे अवलोकन केले.

डॉ. एस. आर.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात  मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शेखर डोंगरे, मान. प्रकाश कडू, डॉ.ए.व्ही. कोल्हे, मान. काटकर, मान. अमरशेट्टीवार, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, डॉ.रमाकांत गजभिये,  व डॉ. गीतांशू डिंकवार आदी विराजमान  होते.

  डॉ. गजभिये यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यापीठांच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देतांना महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दल माहिती दिली. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत प्राप्त केलेल्या प्रगती बाबत माहिती दिली. 

सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांना न घाबरता पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करावा असे सांगताना त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्नशील असल्याबाबत स्पष्ट केले. जीवनात मिळालेली जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी  विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.शेखर डोंगरे यावेळी  बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी स्नेहसंमेलनआयोजित केले जातात, हे स्पष्ट करीत ते कार्य करीत असलेल्या  झाडीपट्टी नाट्य महोत्सवा बाबत माहिती दिली,व हा छंद  जोपासताना  आपण केलेल्या वेळेचे नियोजनाची माहिती देताना विद्यार्थ्यांनी  वेळेचे नियोजन करावे कारण मनात ठरवले तर यश नक्की मिळते, त्याचप्रमाणे कोणत्याही कामाचे कौतुक झाले तर प्रेरणा मिळते हे सांगताना त्यांनी आपल्या ३५ वर्षापासून नाट्य क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. झाडीपट्टी नाट्य क्षेत्राला पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळत नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करीत आपल्या मनातील भावना प्रगट केली.

डॉ. कडू यांनी कृषी महाविद्यालयाची इमारत लवकर व्हावी ही अपेक्षा व्यक्त करताना वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो असे स्पष्ट केले.

डॉ. आर. एन. काटकर यांनी कृषी महाविद्यालयाचे क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती सतत गुंतून असतो हे सांगून ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना संधी देता यावी म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत मांडले.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ. गीतांशू डिंकवार, डॉ. नागेश नवघरे,डॉ. स्वप्निल ठाकरे, डॉ. अक्षय इंगोले डॉ. रमाकांत गजभिये, श्री. मुलगीर आणि धोटे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. गडाख यांनी पुढे बोलताना  म्हणाले की मूल येथील कृषी महाविद्यालयाची इमारत लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. या क्षेत्राचे आमदार आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर्फे यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले. या महाविद्यालयाच्या विकासासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ.अतकरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे एक कोटी बारा लाख रुपयाचा निधी केवळ उपलब्ध झालाच नाही  तर त्यामुळे  महाविद्यालयात एक प्रगतीचा टप्पा  गाठत पलायनवादी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवण्यात यश मिळाल्याचेही स्पष्ट केले व यासाठी डॉ. अतकरे यांच्या कार्याची प्रशंशा केली.

या महाविद्यालयात चार  वेगवेगळे फोरम तयार करा, विद्यार्थ्यांसाठी कोचिंग द्या, तसेच केवळ नौकरी करणारेच नाही तर नौकरी देणारे  विद्यार्थी घडवा आणि  सातासमुद्रापार भरारी घेतील असे विद्यार्थी  घडविण्याचे प्रयत्न करा यासाठी विद्यापीठ पूर्णपणे मदत करेल असे आश्वासन सुद्धा दिले. विद्यार्थ्यांनी जीवनात सकारात्मक विचार करणारे चांगले मित्र मिळवावे आणि आपली प्रगती करावी असेही आवाहन केले.

या प्रसंगी कु. चैताली बेलेकर आणि कु. महारुख शेख यांनी एकापेक्षा एक सरस नृत्याची मेजवानी देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि कार्यक्रमात खऱ्या अर्थाने रंग भरला.

या कार्यक्रमाचे संचालन कु. चैताली बेलेकर, समय उपरीकर तसेच डॉ. प्रवीणा बरडे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. अक्षय इंगोले यांनी केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालया चे सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.