मराठी भाषा सुधारक स्वातंत्र्यवीर सावरकर.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन काल झाला आणि आज कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषा गौरवदिन आहे. या दोन्हींच्या निमित्ताने...
मराठी भाषा सुधारक
स्वातंत्र्यवीर सावरकर.
स्वातंत्र्यवीर सावरकर काय नव्हते ? क्रांतिकारक होते, राजकारणी, समाजकारणी होते, धर्म, भाषा यांचे सुधारक होते, महाकवी, साहित्यिक होते. मराठी भाषेतील जोडाक्षर लेखन सुलभ करण्यासाठी हलंत अक्षरवापरातून त्यांनी लिपीशुद्धीचे प्रयत्न केले. भाषाशुद्धीतही सावरकरांनी मोलाचे योगदान दिले. इंग्रजी, हिंदी, फारसी आदी भाषांमधील अनेक प्रचलित शब्दांना समर्पक पर्यायी शब्द सुचवून ते त्यांनी मराठीत रुजवले. यासाठी आपण तमाम मराठीभाषकांनी स्वातंत्र्यवीरांचे आयुष्यभर ऋणी राहिले पाहिजे. त्यातील काही शब्द असे-
महापौर (मेयर), अर्थसंकल्प (बजेट), दूरदर्शन (टेलिव्हिजन), दिनांक (तारीख), क्रमांक (नंबर), बोलपट (टॉकी), वेशभूषा (कॉश्च्युम), दिग्दर्शक (डायरेक्टर), चित्रपट (सिनेमा), मध्यंतर (इन्टर्व्हल), उपस्थित (हजर), प्रतिवृत्त (रिपोर्ट), नगरपालिका (म्युन्सिपाल्टी), महापालिका (कॉर्पोरेशन), पर्यवेक्षक ( सुपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी), त्वर्य/त्वरित (अर्जंट), गणसंख्या (कोरम), स्तंभ ( कॉलम), मूल्य (किंमत), शुल्क (फी), हुतात्मा (शहीद), निर्बंध (कायदा), शिरगणती ( खानेसुमारी), विशेषांक (खास अंक), सार्वमत (प्लेबिसाइट), झरणी (फाऊन्टनपेन), नभोवाणी (रेडिओ), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर),विधिमंडळ ( असेम्ब्ली), क्रीडांगण (प्ले ग्राउंड), प्राचार्य (प्रिन्सिपॉल), मुख्याध्यापक (हेड मास्टर), प्राध्यापक (प्रोफेसर), परीक्षक (एक्झामिनर), शस्त्रसंधी (सिजफायर), टपाल (पोस्ट), तारण (मॉर्गेज), संचलन (परेड), नेतृत्व (लीडरशिप), सेवानिवृत्त (रिटायर), वेतन (पगार), तसेच नेपथ्य, परीक्षक, गतिमान वगैरे.
अशा भाषातज्ज्ञ सावरकरांना मराठीजनांचा मानाचा मुजरा🙏🏿
@विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment