मूल उपजिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिन साजरा.

मूल उपजिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिन साजरा

मूल,दीपक देशपांडे 

 दि.३/०२/२०२६  बुधवारला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ रामटेके  सर यांच्या मार्गदर्शनाखाली  जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला . डॉ अनिता  मेश्राम ( आयुष वैद्यकीय अधिकारी ) यांनी   मुखाचा कर्करोग,स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच इतर कर्करोगाची लक्षणे, निदान, उपचार याबाबत मार्गदर्शन केले तर  डॉ लाडे  यांनी कर्करोग या आजाराची  माहिती उपस्थितांना दिली .  ममता शेन्डे ( समूपदेशक)यांनी संजय गांधी निराधार योजना तसेच  बस - प्रवासात असणारी सवलत याबद्दल माहिती दिली. 

या कार्यक्रमास मा. ढाले मॅडम , वाघमारे सिस्टर , गेडाम , वाघाडे  , मिना नंदनवार मॅडम आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन ममता शेन्डे आणि आभार प्रदर्शन विजया शिवनकर  यांनी केले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रुग्णालयात उपस्थित जनता व रुग्ण उपस्थित होते.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.