महा ब्रेकिंग वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

 महा ब्रेकिंग 

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!



दीपक देशपांडे.

मूल तालुक्यातील सोमनाथ येथील शेतशिवारात कापूस तोडायला गेलेल्या महिलेवर आज सकाळी ७.५०वाजता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून या महिलेला जागीच ठार केले, यामुळे भयभीत झालेल्या इतर महिलांनी आरडाओरडा केला असता वाघ पळून गेला मात्र ही घटना हातोडा गावात माहिती होताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचे उच्चाधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या शिवाय प्रेत उचलून शवविच्छेदनासाठी पाठवू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

घटनास्थळी मृत झालेल्या महिलेचे नाव सुनीता शामराव भोयर असे आहे.

वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून उपस्थित नागरिकांनी चर्चा सुरू झाली आहे, यावेळी घटनास्थळी भाजपचे प्रभाकर भोयर आणि काॅंग्रेसचे पंकज पुल्लावार घटनास्थळी पोहोचले असून ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे.

वनविभाग तात्पुरती मलमपट्टी करते आणि वेळ निभावून नेते मात्र वाघांचा बंदोबस्त करण्यात आवश्यक पावले उचलली जात नाहीत परिणामी अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे जनता नाराज असून आता या घटनेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

पोलिस व वनाधिकारी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.