धोबी-वरठी समाजाचे वतीने आज संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त बसस्थानकावर भव्य महाप्रसादाचे आयोजन.
धोबी-वरठी समाजाचे वतीने संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त आज बसस्थानकावर भव्य महाप्रसादाचे आयोजन.
दीपक देशपांडे
मूल तालुक्यातील धोबी वरठी समाजातील सर्व बंधु भगिनींना सूचित करण्यात येते की, ग्राम स्वच्छतेचे जनक, विज्ञानवादी, मानवतावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्या पाणी पाजून भूतदयेची शिकवण देणारे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीचा सोहळा दिनांक २३ फेब्रुवारी रोज सोमवारला धोबी वरठी समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाजबांधव, भगिनी, तरुण, तरुणी, संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि बालगोपालांनी या जयंती उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी .
या कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे
संत गाडगेबाबांना यांना अभिवादन व भजन व महाप्रसाद वितरण दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी मूल एसटी बस स्थानकावरील हनुमान मंदिरात सकाळी १०.०० वाजता ,या महाप्रसादाचा लाभ मूलच्या जनतेने घेण्याचेही आवाहन आयोजकांनी केली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment