चंद्रपुरात भाजपचा महापौर
महत्वाची बातमी.
चंद्रपुरात भाजपचा महापौर
संगीता खांडेकर एका मताने आल्या निवडून
चंद्रपूर,दीपक देशपांडे
भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर पदासाठी ..३२ मते घेत झाल्या विजयी , त्यांना ३२ तर काॅंग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना मिळाली ३१ मते...
यावेळी मतदान करताना वंचितचे दोन नगरसेवक राहिले अलिप्त...आणि MIM चा एक सदस्य राहिला तटस्थ..त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली.
उपमहापौर, प्रशांत दानव विजयी:- भाजप सर्मथीत प्रशांत दानव,यांना ३२ मत्ते तर काँग्रेस चे पप्पू देशमुख यांना ३२ मत्ते पडली,मात्र ईश्वर चिठ्ठीनी प्रशांत दानव विजयी झाले.
अशारीतीने दोन्ही महत्त्वाच्या पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आणि पुन्हा एकदा चंद्रपूर ची सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळाले तर काॅंग्रेसमधील अंतर्गत वादविवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला याशिवाय महाविकास आघाडी टिकवण्यासाठी फारसे प्रयत्न फलदायी ठरले नाहीत हे उघड झाले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment