खूनाच्या गुन्हयात आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

 खूनाच्या गुन्हयात आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

पोलिसांच्या प्रयत्नांना यश.

चंद्रपूर दिनांक ३१/०१/२०२६ दीपक देशपांडे 

दिनांक ०३/०३/२०२४ रोजी आरोपी नामे अंबादास लक्ष्मण तलमले रा. मौशी ता. नागभीड जि. चंद्रपुर याने पत्नीने दारू पिण्याकरीता पैसे दिले नाही याचा राग मनात धरून पत्नी व दोन मुलीचे डोक्यावर कुऱ्हाडीने मारून त्यांचा खुन केला. अशा फिर्यादीचे तक्रारी वरून दिनांक ०३/०३/२०२४ रोजी पो.स्टे. नागभीड अप क्रं. ७५ / २०२४ कलम ३०२ भा.दं.वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.



 सदर गुन्हयाचा तपास पो. नि. विजय राठोड व रायटर पो. हवा. रूपेश मुल्लेमवार यांनी करून आरोपी विरुध्द मा. जिल्हा सत्र न्यायालय, चंद्रपुर येथे दोषारोपपत्र दाखल केले. मा. न्यायालयाने सुनावणीअंती आज दिनांक ३१.०१.२०२६ रोजी आरोपी नामे अंबादास लक्ष्मण तलमले रा. मौशी ता. नागभीड यास कलम ३०२ भा. दं. वि. अन्वये दोषी ठरवुन आजन्म कारावास तसेच रूपये १,०००/- दंडाची शिक्षा सुनावली. सदर गुन्हयाचा तपास पो. नि. विजय राठोड व रायटर पो. हवा. रूपेश मुल्लेमवार यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणुन पो. उपनि. कुंदन वाघमारे व सरकारी अभियोक्ता एस. आर. डेंगावार यांनी सरकार पक्षाची बाजु मांडुन सदर गुन्हयामध्ये आरोपीस शिक्षा मिळुन देणे करीता महत्वाची भूमिका बजावली...

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.