शोध वार्ता:-कृषी महाविद्यालय मूल येथे स्वच्छता ही सेवा अभियानाची फलनिष्पत्ती.
शोध वार्ता कृषी महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियानाची फलनिष्पत्ती पण..मूलचे तंत्रनिकेतन कुठे येणार?
दीपक देशपांडेचंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात कृषी महाविद्यालय तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून (सोमनाथ)मूल येथे मंजूर तर झाले,मात्र या महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी इमारत उभी करण्यात प्रशासकीय यंत्रणेला अनेक अडचणी येत होत्या, अशा परिस्थितीत मूल नगर पालिकेच्या स्मार्ट स्कूल ची इमारत बांधून तयार होती ,या इमारतीत किरायाने तात्पुरती सोय करण्यात आली असून सोमनाथ येथे कृषी विद्यालयाचे मालकीच्या जागेवर इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा सुरू होता, आणि तो अजूनही सुरू आहे.
कृषी विद्यालयाचे ताब्यात व वहिवाटीत असणाऱ्या जागेवर नव्याने नवीन इमारत बांधण्यासाठी ही जागा महसूल प्रशासनाने कृषी महाविद्यालयाच्या नावाने हस्तांतरित करुन देणे गरजेचे आहे त्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालय मूल प्रशासन यासाठी महसूल प्रशासन आणि वनविभागाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत,मात्र कुठल्याशा शुल्लक कारणावरून वनविभाग ही जागा महसूल प्रशासनाला व महसूल प्रशासन कृषी महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात चालढकल केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
याबाबतीत कृषी महाविद्यालय सातत्याने वनविभाग, महसूल प्रशासन यांचेकडे मागणी करीत आहे मात्र परस्परांचे अंगुलीनिर्देश करीत प्रकरण प्रलंबित आहे .
यादरम्यान कृषी महाविद्यालय स्थापन झाल्यापासून त्यांची पहिली बॅच पदवी प्राप्त करुन बाहेरही पडली आहे मात्र तुटपुंज्या प्रयोगशाळा आणि किरायाच्या इमारतीत हे महाविद्यालय चालवीले जात होते,मग सततच्या मागणीनंतर आता यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करवून घेत गत दिवाळीत काही साहित्य पुरवठा झाल्याने नवीन वर्गखोल्या, आणि तेथे विद्यार्थी बसण्याची सोय व नवीन प्रयोगशाळा , नवीन यंत्र तंत्राने युक्त तयार करण्यात आल्या व आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले असून विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा व पाॅलीहाऊसचीही सोय करण्यात आली आहे.
यादरम्यान महाविद्यालयात काही प्रशासकीय बदल करण्यात आले असून डॉ टेकाळे यांच्या जागेवर डॉ अतकरे यांची सहयोगी अधिष्ठाता म्हणून बदली ही करण्यात आली असून डॉ अतकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जून २०२५मध्ये महाविद्यालय परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत वाढलेला केरकचरा आणि झाडेझुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढून जागा समतल करण्यात आली, महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवून जागेची स्वच्छता आणि या जागेवर सुंदर बाग बगीचा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
यासाठी त्यांनी महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियानाची सुरुवात केली, आणि अभ्यासासोबतच दर गुरुवारी सायंकाळी एक तास सेवा सुरू केली.बघताबघता या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या फळ व फुलझाडांची लागवड , प्रयोग व संवर्धन कार्य सुरू झाले ,त्यात काही प्राध्यापकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्षलागवड सुरू केली,फुल आणि फळझाडांची लागवड केली,त्यावर रासायनिक किडनाशकांचा वापर न करता सेंद्रिय (आर्ग्यानिक)पद्धतीने गांडुळखत आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेले औषधांचा वापर करून त्यांच्या वाढिसाठी प्रयत्न केले परिणामी आज अवघ्या सहा महिन्यांत याठिकाणी एक सुंदर नंदनवन फुलविण्यात त्यांना यश मिळाले आहे.
याबाबत आम्ही कृषी महाविद्यालयाला भेट दिली असता ,आज मागील सहा महिन्यापासून महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नंदनवन फुलविता आले, त्याबद्दल सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचे सहकार्य मिळाल्याने हे शक्य झाले त्यामुळे या सर्वांचे मनस्वी आभार महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ अतकरे यांनी मानले.
ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आम्ही भेटिचा उद्देश विशद केला व एकीकडे हेच महाविद्यालय किरायाच्या इमारतीत असून तेही याठिकाणी राहिलं की नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे कारण काय तर म्हणे , मूलमध्ये या कृषी महाविद्यालयापाठोपाठ यावर्षी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून नवीन शासकीय तंत्रनिकेतन (पाॅलिटेक्निक महाविद्यालय) मूल येथे सुरू होण्यासाठी परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली असून ते पुढिल शैक्षणिक वर्षापासून कार्यरत करणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे आणि या महाविद्यालयासाठी मूल शहरांत दुसरी इमारत नसल्याने तेही याच इमारतीत कार्यरत करण्याचा एक अफलातून प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आमच्या सुत्रांकडून प्राप्त होत आहे.
याचाच अर्थ एक ना धड भाराभर चिंध्या असा काहिसा प्रयत्न या निमित्ताने सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे मात्र याबाबत आम्ही कृषी महाविद्यालय मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ अतकरे यांची भेट घेतली असता याबाबत आम्ही अनभिज्ञ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ,याउलट आम्हालाच यावर्षी पहिल्यांदा पहिल्या माळ्यावरील खोल्या नगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या असून आम्ही आता कुठं नवीन तंत्रज्ञान विकसित करुन नवीन प्रयोगशाळा आणि पाॅलीहाऊसचीही निर्मिती करुन विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यश मिळवले असल्याचे स्पष्ट केले आहे व प्रशासकीय यंत्रणेला आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या कृषी विद्यालयाचे ताब्यात व वहिवाटीत असणाऱ्या जागेचे हस्तांतरण तातडीने आम्हाला करुन द्यावे जेणेकरून आम्ही येथे नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा करून अतीशिघ्रतेने बांधकाम पूर्ण करुन आमच्या मालकीच्या इमारतीत महाविद्यालय स्थलांतरित करु शकू त्यानंतर प्रशासनाने ही इमारत कुणालाही आवंटित करण्यास आम्हाला काही हरकत असण्याचे कारण नाही तोपर्यंत असा विचार करून एकही महाविद्यालय व्यवस्थितपणे कार्य करु शकणार नाही आणि विद्यार्थ्यांना योग्य वातावरण उपलब्ध होणार नाही असे मतही व्यक्त केले.
मूलमध्ये एक कृषी महाविद्यालय आल्याने मूलच्या आर्थिक बळकटीला हातभारच लागलेला असून शासकीय तंत्रनिकेतन आले तर त्यात आणखी भरच पडणार आहे मात्र या एकाच कारणासाठी विद्यार्थ्यांना सुयोग्य शैक्षणिक वातावरण निर्माण करुन त्यांना आवश्यक शैक्षणिक सोयीसुविधा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. असे आम्ही जनतेला आणि काही शिक्षणतज्ज्ञांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रकाराबाबत अत्यंत दुर्भाग्य पूर्ण निर्णय असल्याचे मत व्यक्त करीत पूर्ण सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय नवीन महाविद्यालय सुरू करण्याची घाई न करण्याची आग्रही भूमिका घेतली आहे, आणि आताशा बाळसं घेत असलेल्या कृषी महाविद्यालयाला पूर्ण बहरण्याची संधी कुणी नाकारू नये कारण आपला भाग हा कृषिप्रधान असून यावर मोठ्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित असून जनता शेती आधारित उद्योगांवर अवलंबून असल्याचे आणि शेती विकासासाठी त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन या महाविद्यालयाचे वतीने राबविण्यात येणाऱ्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे वतीने होत असल्याचेही या निमित्ताने पुढे आले आहे.
कषी महाविद्यालय प्रशासन, महसूल प्रशासन, वनविभाग आणि नगरप्रशासनाचे वतीने याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि मूलमध्ये कृषी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन सह इतरही शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात परंतू दुसरी सुविधा उपलब्ध होत असताना पहिली ची सुरक्षा धोक्यात येणार नाही याबाबत साशंकता निर्माण होऊ नये व एक चांगली प्रगत व्यवस्था निर्माण व्हावी ,व मूलच्या भल्यासाठी एक चांगला निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहोत मात्र अचानक असं काही घडलं असं कुणी म्हणू नये यासाठी आम्ही आमच्या समोर आलेलं सत्य तुमच्या समोर मांडण्याचा हा एक प्रयत्न केला आहे. आणि हाच आमचा हे वृत्त प्रकाशित करण्याचा मुख्य उद्देश आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

जनता जनार्दनास एक चांगली बातमी मिळाली.
ReplyDelete